Solapur : लाकूड जाळून कोळसा करणारे मालामाल; चिल्लारीच्या नावाखाली जळतेय काय?

नियत्रंण कुणाचेच नाही; हा कोळसा कधी व कुठे विकला जातो याची कुणालाही कल्पना नाही.
coal makers loaded with money forest department deforestation solapur crime police
coal makers loaded with money forest department deforestation solapur crime policesakal
Updated on

सोलापूर : अक्कलकोटसह, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ व माढा तालुक्यात लाकूड जाळून कोळसा बनविणाऱ्यांची संख्या वाढत असून मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या या व्यवसायावर कोणाचेही नियत्रंण नाही. चिल्लार बाभूळ तोडण्यास वनविभागाच्या परवानगीची गरज नसली तरी नेमकी कोणत्या प्रकारच्या बाभळी तोडल्या जातात, याची खातरजमा करण्यास वनविभागाला वेळही नाही.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दर वर्षी दिवाळीनंतर नगर जिल्ह्यातील ठराविक लोक येतात. शेतशिवारातच राहुटी टाकून राहतात. कुंभाराचा अवा पेटविल्याप्रमाणे रोज रात्री मोठी भट्टी पेटवतात. मोठ्या प्रमाणात लाकूड जाळून कोळसा तयार केला जातो. तयार झालेला कोळसा विक्रीसाठी दुसरीकडे हलवला जातो.

हा कोळसा कधी व कुठे विकला जातो याची कुणालाही कल्पना नाही. शक्यतो रात्रीच्यावेळी हा कोळसा विक्री करता हलवला जात असावा, असा संशय गावकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. किल्लारीच्या लाकडांना दिली जाणारी किमंत व प्रतिवर्षी न चुकता येणाऱ्या व मागील अनेक वर्षे याच व्यावसात असलेल्या या कुटुंबांना कोळशाच्या विक्रीतून चांगली आर्थिक प्राप्ती होत असावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

coal makers loaded with money forest department deforestation solapur crime police
Solapur : सोलापुरात आ.धंगेकरांचा सत्कार, मात्र चर्चा राष्ट्रवादी- शेकाप फायद्याची आणि काँग्रेसच्या गटबाजीची

शेतकऱ्यांकडून लाकूड खरेदी

पडीक जमिनी, बांध व ओढ्याच्या काठावर न लावता येणारी व मोठ्या प्रमाणात वाढणारी बाभूळ म्हणजे चिल्लारी. ही चिल्लारी बाभूळ ही अत्यंत जाड काटे असलेली व या लाकडाचा फक्त सरपणासाठीच उपयोग होत असल्याने शेतकऱ्यांना ही झाडे डोकेदुखी ठरतात.

शिवाय या झाडाचा आकार झुडूपवजा असल्याने या झाडाजवळ इतर झाडे वाढत नाहीत. जनावरांना चरण्यासाठीदेखील ही झाडे अडचणीची ठरतात. मात्र, कोळसा भट्टी करणारे लोक ही झाडे लिलया तोडतात. ठराविक किमंत देऊन कोळशाचे व्यापारी ही झाडे विकत घेतात. त्याच जागेवर लाकूड जाळून कोळसा तयार करतात.

प्रदूषण वीटभट्टीइतकेच

कोळसा भट्टीमुळे होणारे प्रदूषण हे वीटभट्टीइतकेच आहे. तोडलेले लाकूड संपूर्ण जळू न देता अर्धवट जाळलेले जाते. यामुळे माती व पाण्याचा वापर करून भट्ट रात्रभर धूपण्यास ठेवली जाते. सूर्यास्तानंतर या भट्ट्या पेटविल्या जात असल्याने या भट्टीतून बाहेर पडणारा धूर व कार्बनडाय ऑक्साइड याची तीव्रता दिसून येत नाही.

coal makers loaded with money forest department deforestation solapur crime police
Solapur Dance Bar : डान्स बार बहाद्दर भूमिहीन; बारबाला मात्र थ्री- थ्री बीएचके लक्झरी फ्लॅटच्या मालकीण!

मात्र वीटभट्टी जितकी प्रदूषणकारी आहे तितकी प्रदूषणकारी कोळसाभट्टी आहे. मात्र, या कोळसाभट्टीकडे प्रशासनाचा कोणताही विभाग गांभिर्याने घेत नाही. तसेच शेतकऱ्यांना चिल्लारी काढण्यास सहय्यभूत होत असल्याने ग्रामस्थांकडूनही याबाबत तक्रारी येत नाहीत. पर्यावरणवादी संस्था व पर्यावरणप्रेमींनी याबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे.

लक्ष्यवेधी...

  • कोळसा भट्टीतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण

  • चिल्लारीच्या नावाखाली इतर झाडांची तोड

  • महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळ याबाबत अनभिज्ञ

  • कोळसा निर्मितीबद्दल महसूल विभागाकडे नाही कोणतीही नोंद

  • खासगी जमिनीवरील कोळसा निर्मिती रोखता येत नसल्याचे वनविभागाचे मत

coal makers loaded with money forest department deforestation solapur crime police
Solapur News : मोहोळ बस स्थानक बनले चोरांचे आगार विविध उपाय योजनांची गरज

खासगी मालकीच्या जमिनीतील चिल्लार बाभूळ तोडण्यास व कोळसा तयार करण्यास कोणत्याही परवानगीची गरज नाही. मात्र, वनविभागाच्या व शासकीय मालकीच्या जमिनीतील चिल्लार तोडण्यास बंदी आहे. कोळसा निर्मितीला परवानगीची गरज नाही, मात्र वाहतुकीसाठी पास आवश्यक आहे. विनापरवाना कोळशाची वाहतूक करताना आढळल्यास कारवाई केली जाते.

- धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, सोलापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.