जिल्हाधिकारी कार्यालय जाणार महसूल भवनात
सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून मिलिंद शंभरकर (solapur collector milind shambharkar )यांनी सूत्रे स्वीकारली आणि तब्बल दोन वर्षे कोरोना महामारीत(corona pandemic) गेली. कोरोनासोबतच अवकाळी पाऊस आणि महापूराचे संकट सोलापूर जिल्ह्याने सोसले आहे. कोरोनाचे संकट परतावून लावण्यासोबतच सोलापूरचा शाश्वत विकास (solapur development)साधण्यासाठी कामांचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आखण्यात आले आहे. सोलापूरच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेली प्रमुख कामे २०२२ या वर्षात मार्गी लावण्याचा संकल्प जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केला आहे.
कोरोना लसीकरणावर सध्या जिल्हा प्रशासनाचा विशेष भर आहे. लवकरच शंभर टक्के लसीकरणयुक्त सोलापूर जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख होईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वाढल्यास त्यांना वेळेवर व कमी त्रासात उपचार मिळावेत यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेला भूसंपदानाचा विषयही लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
पालखी मार्गाच्या चौपदरीकरणामुळे, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांमुळे आणि नमामी चंद्रभागा योजनेतील कामांमुळे पंढरपूर व परिसर अधिक सुसज्ज होईल असा विश्वासही जिल्हाधिकारी शंभरकरयांनी व्यक्त केला आहे.सात रस्ता येथील शासकीय दूध योजनेच्या जागेत महसूल भवनाची नवीन इमारत साकारली जात आहे. गेल्या अनेकवर्षांपासून प्रलंबित असलेली ही इमारत आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या एप्रिलमध्ये महसूल भवनाची इमारत कार्यान्वित करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे. एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील काही शाखांचे कामकाज महसूल भवनात होणार असल्याचे आताजवळपास स्पष्ट झाले आहे.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या(increasing corona patients) पाहता आम्ही पुन्हा एकदा कोरोना महामारीवर लक्ष केंद्रित केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि कोरोना लसीकरणावर (covid vaccination)विशेष भर दिला जात आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्याचे आतोनात नुकसान झाले आहे. कोरोनामुळे झालेल्या वित्तहानीची व जीवीतहानीची जवळपास सर्वच कुटुंबांना झळ बसली आहे. तिसऱ्या लाटेची झळ जिल्ह्याला बसू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे.
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी
ठळक बाबी
पालखी मार्गाचे भूसंपादन शंभर टक्के होणार पूर्ण
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यास प्रशासन सज्ज
पर्यटनाच्या माध्यमातून सोलापूरचा विकास साधण्यासाठी विशेष आराखडा(solapur development)
ई-पीक पाहणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न
सात बारा संगणकीकरणाची मोहीम होणार अधिक गतीमान
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.