राष्ट्रवादीचे कल्याणराव काळे विरोधात 'ईडी', 'आयटी'कडे तक्रार!

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवारांची माहिती
कल्याणराव काळे
कल्याणराव काळेSakal
Updated on
Summary

कल्याणराव काळे यांनी अलीकडेच विक्री केलेल्या सीताराम महाराज साखर कारखान्यासंदर्भात राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी ईडी व इन्कम टॅक्‍स विभागाकडे लेखी तक्रार केली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरचे (Pandharpur) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांनी अलीकडेच विक्री केलेल्या सीताराम महाराज साखर कारखान्यासंदर्भात राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष दीपक पवार (Deepak Pawar) यांनी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate - ED) व इन्कम टॅक्‍स (Income tax - IT) विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांच्या या तक्रारीनंतर कल्याणराव काळे हे "ईडी'च्या रडारवर येण्याची शक्‍यता आहे.

कल्याणराव काळे
उस्मानाबादच्या खासदारांनी गाजवली सोलापूरची नियोजन बैठक!

सीताराम महाराज साखर कारखान्यासाठी कल्याणराव काळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कारखान्याचे शेअर्स देतो असे सांगून शेतकरी, कामगार, शिक्षक आणि वाहन मालक अशा जवळपास 15 हजार लोकांकडून सुमारे 35 कोटी रुपये गोळा करून त्याचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप दीपक पवार यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ईडीची छापेमारी सुरू आहे. अशातच पंढरपूर येथील राष्ट्रवादीचे नेते, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल केल्याने सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत दीपक पवार यांनी आज पत्रकार परिषदेत कल्याणराव काळे यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. ऍड. दीपक पवार म्हणाले की, खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीराताराम महाराज साखर कारखान्यामध्ये कल्याणराव काळे यांच्यासह संचालक व कार्यकारी संचालक यांनी हजारो लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. 2010 ते 2015 या दरम्यान सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याकडे ऊस दिलेल्या शेतकरी, कामगार, ट्रॅक्‍टर मालक, व्यापारी व शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून शेअर्स देतो म्हणून सुमारे 35 कोटी रुपये गोळा केले आहेत. हे पैसे घेतल्यानंतर अनेकांना पावत्याही दिल्या नाहीत. तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांकडून शेअर्सपोटी पैसे गोळा केले आहेत. परंतु वाडीकुरोली, पिराचीकुरोली आणि धोंडेवाडी या तीन गावातील 4 हजार 952 शेतकऱ्यांची नावे शेअर्सच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अन्य शेतकऱ्यांनी भरलेल्या पैशाचे काय? असा सवालही श्री. पवार यांनी उपस्थित केला आहे.

कारखान्याच्या सर्व आर्थिक व्यवहाराची कसून चौकशी करावी, अशी लेखी तक्रार ईडी, आयटी, सेबी आदी संस्थांसह जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. लवकरच या प्रकरणाची चौकशी सुरू केली जाईल, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. चौकशीनंतर कल्याणराव काळे यांचा मोठा आर्थिक घोटाळा समोर येईल, असेही श्री. पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कल्याणराव काळे
Solapur : आमदार प्रणिती शिंदेंच्या मनात आहे तरी काय?

माझ्या संदर्भात करण्यात आलेले आरोप पूर्णतः खोटे आहेत. असा कोणताही आर्थिक घोटाळा केलेला नाही. या संदर्भात मी कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे. अशा चुकीच्या आरोपांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये.

- कल्याणराव काळे, अध्यक्ष, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.