Solapur News : शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्याची गय केली जाणार नाही; समाधान आवताडे

पैश्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही
MLA Samadhan Autade
MLA Samadhan Autadesakal
Updated on

मंगळवेढा : विजेच्या ट्रांसफार्मरसाठी निधी मंजूर असताना शेतकऱ्याकडून पैसे घेतल्याची तक्रार येताच पैसे घेणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याच्या चौकशी आदेश देवून भविष्यात पैश्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असा दम समाधान आवताडे यांनी दिला.

आमदार आपल्या दारी या अभियाना द्वारे तालुक्यातील माचणूर, ब्रह्मपुरी, मुंढेवाडी, रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर, बोराळे, अरळी, नंदूर, डोणज, भालेवाडी या गावाच्या गावभेट दौय्रात तांडोर येथे बोलत होते.

त्यांच्यासमवेत जिल्हा नियोजन सदस्य प्रदीप खांडेकर राजेंद्र सुरवसे,दिगंबर यादव, यांच्यासह प्रांताधिकारी बी. आर माळी, तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता दयासागर दामा कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, पोलीस निरीक्षक रणजित माने,

सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे,सहायक निबंधक प्रमोद दुर्गुडे, बाल प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारोळे, लघु पाटबंधारे विभाग पारवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ भिमराव जानकर पुरवठा विभागाचे हनुमंत पाटील,जि.प.व सार्वजनिक बांधकामचे अभियंता, वन विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

या दौय्रात बोलताना आवताडे म्हणाले की,गावातील नेत्यांनी विकास कामांच्या पाठपुराव्याला कमी पडू नका, त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही.या मतदारसंघातील विकास कामांचा अनुशेष भरून काढल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही अशी ग्वाही देत तामदर्डी येथील भिमा नदीवरील बंधारा बांधणीचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे सांगितले.

या बंधाऱ्याअभावी गेली अनेक वर्षे या भागातील माचणूर, तामदर्डी, अरळी, बोराळे, सिद्धापूर, तांडोर, अरबळी, बेगमपूर, मुंढेवाडी या गावांतील व या नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी पावसाळ्यामध्ये पाणी अडविण्यासाठी लोकवर्गणी च्या सहाय्याने मातीचे बांध घालावे लागत होते.पण भविष्यात तशी वेळ येणार नाही.

या दौय्रात उजनी कालवा निर्मितीसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित झाल्या आहेत अशा अनेक शेतकऱ्यांचा मोबदला आपणास अद्यापपर्यंत मिळाला नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

यावर आवताडे यांनी प्रांताधिकारी बी. आर. माळी यांना दि. २२ सप्टेंबररोजी तहसीलदार, भूमी अभिलेख, उजनी कालवा संबंधित अधिकारी व पदाधिकारी आणि लाभार्थी शेतकरी यांची बैठक घेऊन योग्य तो सकारात्मक तोडगा काढून शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()