शिवसेना पदाधिकाऱ्यांना पक्षांतराची भीती! संपर्कप्रमुख नाहीत, मंत्र्यांकडून निधी मिळेना

सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे शहाजी पाटील (सांगोला) हे एकमेव आमदार आहेत. त्याशिवाय शिवसेनेचा जिल्ह्यात ना खासदार ना कोणी आमदार. पूर्णवेळ संपर्कप्रमुखही नसल्याने महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पक्षाला मोठे खिंडार पडेल, याची त्यांना चिंता लागली आहे.
शिवसेना
शिवसेनाesakal
Updated on
शिवसेना
सोलापूर : 2.14 लाख रुग्ण कोरोनामुक्‍त! प्रतिबंधित लसीमुळे रेमडेसिवीर लागले नाही

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे शहाजी पाटील (सांगोला) हे एकमेव आमदार आहेत. त्याशिवाय शिवसेनेचा जिल्ह्यात ना खासदार ना कोणी आमदार. ग्रामपंचायतींवर सर्वाधिक वर्चस्व मिळविल्यानंतर पंचायत समित्या, जिल्हा परिषदेत यश मिळविणे सोयीचे होते. परंतु, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सूचवलेल्या कामासाठी निधी आणायचा कुठून अन्‌ मागायचा कोणाला, असा प्रश्‍न शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना सतावू लागला आहे. पूर्णवेळ संपर्कप्रमुखही नसल्याने महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पक्षाला मोठे खिंडार पडेल, याची त्यांना चिंता लागली आहे.

शिवसेना
परीक्षेसाठी एका वर्गात 25 विद्यार्थी! मुख्याध्यापकांना द्यावे लागणार हमीपत्र

2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार तानाजी सावंत यांनी सोलापूर शहर-जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना घेऊन कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत केले होते. शेवटच्या टप्प्यात त्यांना पक्षाने मंत्रीपद दिले आणि त्यांचे सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर दौरे वाढले. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षातील गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र होते. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा सर्वांनाच विशेषत: त्यांच्या समर्थकांना विश्‍वास होता. परंतु, पक्षाने भाजपसोबतची मैत्री तोडली आणि विरोधातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसशी हातमिळवणी केली. बहुतेक जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी व कॉंग्रेसकडेच गेले. आमदारांना दरवर्षी दोन ते तीन कोटींचा विकासनिधी मिळतो. बहुतेक आमदार पुढील निवडणुकीची पायाभरणी करण्यासाठी तो निधी आपल्या मतदारसंघात खर्च करण्यास प्राधान्य देतात. दुसरीकडे ज्या मतदारसंघात आपल्याला सर्वाधिक मताधिक्‍य मिळविले, त्याठिकाणीच सर्वाधिक निधी देण्याचा खासदारांचा प्रयत्न राहतो. दरम्यान, गाव व तालुका स्तरावरील मेळावे, बैठकानंतर अनेक कार्यकर्त्यांकडून विकासकामे सुचविली जातात आणि त्यासाठी निधीची मागणी केली जाते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील 12 विधासभा मतदारसंघ आणि दोन लोकसभा मतदारसंघापैकी केवळ एका विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे विकासकामांसाठी निधी मागायचा कुणाला, असा प्रश्‍न पदाधिकाऱ्यांना अनेकदा पडला. त्यांचे हे गाऱ्हाणे पक्षप्रमुख तथा पक्षातील वरिष्ठांकडे सातत्याने मांडण्यासाठी संपर्कप्रमुखदेखील जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्रीपद पक्षाकडे असूनही निधी मिळत नसल्याची खंत जिल्ह्यातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर "सकाळ'कडे व्यक्‍त केली.

शिवसेना
दहावी-बारावी परीक्षेसाठी शाळेचे शिक्षकच पर्यवेक्षक! 'कॉपी'चे स्कॉड नसणार

कोठेंनी निधीमुळेच धरली राष्ट्रवादीची वाट
सोलापूर शहर-ग्रामीणमधील कॉंग्रेस, शिवसेनेतील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेतील शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते महेश कोठेंना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी हवी होती. मात्र, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली. तरीही, त्यांना पक्षात ठेवण्यात आले. परंतु, आगामी निवडणुकांचा अंदाज घेऊन त्यांनी सोलापूर विमानतळावर पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन निधीसंदर्भात निवेदन दिले. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत अनेकदा भेट घेतली. तरीही, त्यांनी सूचविलेल्या कामांसाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण खाली ठेवून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला. आता कोठेंची खंत ही आपलीही खंत समजून त्यांचे समर्थक नगरसेवक त्यांच्यासोबत जातील का, याचा अंदाज बांधला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()