लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेले मताधिक्य, महाविकास आघाडीच्या वाटपात पंढरपूरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या पाहता हा मतदारसंघ काँग्रेसला सुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू झाली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांना या मतदारसंघातून दलित, मराठा, मुस्लिम, धनगर या फॅक्टरच्या जोरावर 45 हजार 523 इतक्या मताचे मताधिक्य मिळाल्यामुळे त्यांनी त्यांच्या विजयात या मतदारसंघाने प्रमुख भूमिका बजावल्यामुळे खा.प्रणिती शिंदे यांना भविष्यातील आपली राजकीय गादी मजबूत करण्याच्या दृष्टीने हा मतदारसंघ काँग्रेसकडे रहावा या दृष्टीने खा प्रणिती शिंदे यांनी वरिष्ठ पातळीवरून बोलणी करत त्यासाठी नेटाने प्रयत्न करत आहेत.