काँग्रेस महिला शहराध्यक्षा म्हणाल्या, महापालिकेत सत्ता आमचीच! बैठकीला ३५ महिला

राष्ट्रवादीसोबतच भाजपने निवडणुकची जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महिला काँग्रेसची बैठक पार पडली. त्यावेळी ३५ महिलांच्या उपस्थितीत शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर यांनी महापालिकेवर काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी गर्जना केली.
Congress Party
Congress Partyesakal
Updated on

सोलापूर : महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या महिन्याच्या शेवटी महापालिकेची आरक्षण सोडत होणार आहे. राष्ट्रवादीसोबतच भाजपने निवडणुकची जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महिला काँग्रेसची बैठक पार पडली. त्यावेळी ३५ महिलांच्या उपस्थितीत शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर यांनी महापालिकेवर काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी गर्जना केली.

Congress Party
सोलापूर: काँग्रेसला गळती अन्‌ नेत्यांचे लक्ष मुंबई-दिल्लीत; राष्ट्रवादीचा डाव?

ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिकेची निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या जागाही यावेळी वाढल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाला ११३ जागांवर उमेदवार द्यावे लागणार आहेत. यापूर्वी भाजप स्वबळावर निवडणूक लढल्याने त्यांना उमेदवारांची अडचण नाही. परंतु, महाविकास आघाडी होणार की नाही हे अनिश्चित असल्याने काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला तेवढे तगडे उमेदवार शोधावे लागणार आहेत. विरोधकांचा पराभव करतील, अशा उमेदवारांचा शोध सुरु आहे. तर महापालिकेत एक नंबरचा पक्ष कोणता, राष्ट्रवादी की काँग्रेस, यांच्यात रस्सीखेच सुरु झाली आहे. काहीही करून यंदा महापौर आपल्याच पक्षाचा व्हायला हवा म्हणून राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावरील महेश कोठेंनी काँग्रेसला पक्षांतराच्या माध्यमातून पोखरायला सुरवात केल्याची चर्चा आहे. अशावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी संघटित करणे आवश्यक आहे. पण, तसे होत नसल्याने अनेकजण नाराज असून काहींनी पक्षाला रामराम ठोकला आहे. दोन महिला पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्यानंतर महिला शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर यांनी काँग्रेस भवनात बैठक घेतली. खूप दिवसांनी महिला शहराध्यक्षांची बैठक तथा मेळावा आयोजित केल्याने काँग्रेस भवनावरील हॉलदेखील अपुरा पडेल, असे काहींना वाटत होते. पण, त्या बैठकीला अख्ख्या शहरातून केवळ ३५ महिलांनी हजेरी लावली. वास्तविक पाहता महिला शहराध्यक्षांच्या बैठकीला आगामी निवडणुकीस इच्छुक महिला उमेदवार, आजी-माजी नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित राहायला हवेत. पण, तसे होत नसल्याचे चित्र आहे. तरीदेखील, त्या बैठकीत महिला अध्यक्षांनी काँग्रेसचीच महापालिकेवर सत्ता येणार, अशी गर्जना केली. निवडणुकीसाठी महिला काँग्रेस सज्ज असून सर्व तयारी झाल्याची बतावणीदेखील त्यांनी यावेळी केली, हे विशेष.

Congress Party
रस्ता सुरक्षेसाठी खासदारांना मिळेना वेळ! जिल्ह्यात साडेतीन वर्षांत दोन हजार मृत्यू

दिल्लीचे सोडा, गल्लीचे बघा...
काँग्रेसची ताकद कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर नियोजनाच्या बैठकांवर बैठका होत आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील, राज्यातील वरिष्ठ नेतेमंडळी त्या बैठकीला उपस्थित राहिले. पण, स्थानिक नेत्यांनी सातत्याने सत्ता मिळाल्याने पक्षाची ताकद असलेल्या ठिकाणी भेटीच दिल्या नाहीत. पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे जी गावे, तालुके काँग्रेसचा बालेकिल्ला होती, तशा बहुतेक गावांमधल्या अनेक कार्यकर्त्यांनी काळाची पावले ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे वगळता मागील काही वर्षांत काँग्रेसचा एकही नेता जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात गेलेला नाही. जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटलांनी वरिष्ठ नेत्यांकडे अनेकदा वेळ मागितला, पण त्यांना तो अजूनही मिळालेला नाही हे विशेष. त्यामुळे दिल्लीचे सोडा, अगोदर गल्लीतील बघा, असा सल्ला जुने कार्यकर्ते नेत्यांना देत असल्याची स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.