पाच तालुक्‍यांसाठी कंटेन्मेंट झोन ! पोलिस बंदोबस्तासाठी बीडीओंना सूचना

पाच तालुक्‍यांसाठी कंटेन्मेंट झोन ! पोलिस बंदोबस्तासाठी बीडीओंना सूचना
पाच तालुक्‍यांसाठी कंटेन्मेंट झोन ! पोलिस बंदोबस्तासाठी बीडीओंना सूचना
पाच तालुक्‍यांसाठी कंटेन्मेंट झोन ! पोलिस बंदोबस्तासाठी बीडीओंना सूचनाMedia Gallery
Updated on
Summary

प्रांत अधिकारी व पोलिस यांच्या माध्यमातून या गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्राची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.

सोलापूर : माढा (Madha), करमाळा (Karmala), पंढरपूर (Pandharpur), सांगोला (Sangola) आणि माळशिरस (Malshiras) तालुक्‍यातील कोरोनाची (Covid-19) रुग्णसंख्या आटोक्‍यात येत नाही. या तालुक्‍यांतून इतर तालुक्‍यात संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने (District Administration) पाच तालुक्‍यात प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) (Containment zone) प्रभावी उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पाच तालुक्‍यातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या गावांमध्ये प्रभावी उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Solapur Zilla Parishad Chief Executive Officer Dilip Swamy) यांनी दिली.

पाच तालुक्‍यांसाठी कंटेन्मेंट झोन ! पोलिस बंदोबस्तासाठी बीडीओंना सूचना
उपळाई आरोग्य केंद्रात त्रुटी! तपासणीसाठी आयएएस आव्हाळेंची नेमणूक

या पाच तालुक्‍यांतील ज्या गावांमध्ये दहापेक्षा अधिक ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या आहे, त्या गावांचा अभ्यास करण्याची सूचना सीईओ स्वामी यांनी या पाच तालुक्‍यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना केली आहे. प्रांत अधिकारी व पोलिस यांच्या माध्यमातून या गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्राची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. या पाच तालुक्‍यांतील ज्या गावांमधील रुग्णसंख्या कमी झाली आहे, त्या गावातील ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांची सेवा विशेष अधिकारी म्हणून अधिक रुग्णसंख्या असलेल्या गावांसाठी घेतली जाणार आहे. या पाच तालुक्‍यांतील गावांमधील होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करून रुग्णांना संस्था विलगीकरणात ठेवण्याची सूचनाही सीईओ स्वामी यांनी दिली आहे. या पाच तालुक्‍यातील गटशिक्षणाधिकारी यांच्या समन्वयाने गावातील कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगचे पथक कार्यान्वित केले जाणार आहे. या पथकाच्या कामाचा आढावा दर सोमवारी घेतला जाणार आहे. तालुकास्तरीय कोअर समितीची नियमितपणे बैठक घ्यावी अशी सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केली आहे.

पाच तालुक्‍यांसाठी कंटेन्मेंट झोन ! पोलिस बंदोबस्तासाठी बीडीओंना सूचना
श्रावण विशेष : अध्यात्माची अनुभूती देणारी चिंचगाव टेकडी !

तालुक्‍यांच्या ठिकाणीच होणार स्वातंत्र्यदिन : जिल्हाधिकारी शंभरकर

ग्रामीण भागातील माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस तालुक्‍यातील रुग्णसंख्या आटोक्‍यात येत नाही. या तालुक्‍यांसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. 15 ऑगस्ट रोजीचे ध्वजवंदन व इतर कार्यक्रम या पाच तालुक्‍यांनी फक्त तालुका मुख्यालयातच राबवावा, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. तालुका मुख्यालयात प्रांतधिकारी, लोकसभा व विधानसभा सदस्य, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांच्यासह मोजक्‍याच व्यक्तींच्या उपस्थितीत कोरोनाच्या नियमांचे पालन करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची सूचना करण्यात आली आहे. उर्वरित तालुक्‍यांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करून स्वातंत्र्यदिन साजरा होणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.