गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून उजनी जलाशयातील पाण्याला हिरवा रंग आला असून, काठावरील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे.
केत्तूर (सोलापूर) : गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून उजनी (Ujani Dam) जलाशयातील पाण्याला हिरवा रंग आला असून, काठावरील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. यामुळे मच्छिमार (Fisherman) तसेच शेतकऱ्यांना (Farmers) त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, जलाशय काठावरील तसेच इतर सोलापूरसह (Solapur) अन्य शहरांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी हेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने आगामी काळात आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याचे संकेत मिळत आहेत. (Contaminated water from Ujani dam is being supplied to many cities)
सोलापूरसह पुणे (Pune) तसेच नगर (Nagar) जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी जलाशयाच्या पाण्याला हिरवा रंग आला असल्यामुळे हे पाणी पूर्णपणे प्रदूषित (Water Pollution) झाले आहे. डिकसळ पूल, खातगाव, टाकळी, रामवाडी, पोमलवाडी, केत्तूर, गोयेगाव, वाशिंबे, उमरड, सोगाव आदी उजनी लाभक्षेत्रातील पाण्याला हिरवा रंग आला आहे. देशी- विदेशी शास्त्रज्ञांनी (Scientist) संशोधन करून उजनीतील पाणी पिण्यायोग्य नाही, हे वारंवार सांगितले आहे; परंतु राजकीय नेते व प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे उजनीला लागलेले प्रदूषणाचे हे ग्रहण कधी सुटणार, हा मोठा प्रश्नच आहे. उजनी जलाशयात पुणे जिल्हा व परिसरातील मैलामिश्रित सांडपाणी तसेच रासायनिक कंपन्यांचे (Chemical Companies) निरुपयोगी पदार्थ विनाप्रक्रिया आहे तसेच उजनीत सोडले जात आहेत. या भयानक प्रदूषणामुळे जलाशयातील पाणवनस्पती तसेच जलचरांवर विपरीत परिणाम होत आहे. या दूषित पाण्यामुळे वाढणारे पक्षी सौंदर्य कालांतराने कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
प्रदूषणामुळे हिरवेगार झालेल्या पाण्याशी संपर्क झाल्यास अंगाला खाज सुटणे, फोडं येणे यांसारखे प्रकार होत आहेत.
- सोमनाथ कनिचे, मच्छिमार, केत्तूर
मानवनिर्मित प्रदूषणामुळे उजनीचे पाणी अत्यंत विषारी झाले आहे. यावर कडक प्रतिबंध करणे आता गरजेचे झाले आहे. वरचेवर वाढणारे पक्षीसौंदर्य या प्रदूषणामुळे कमी होणार आहे.
- कल्याणराव साळुंके, पक्षीमित्र, करमाळा
या पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असल्याने पाण्याजवळ जाणे धोकादायक ठरत आहे. हे पाणी पाहून कोणीही याला पाणी म्हणण्याचे धाडस करणार नाही.
- अशोक पाटील, ग्रामस्थ, केत्तूर
या पाण्यामुळे परिसरातील जनावरांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होत आहे. भीमा नदीवरील जलप्रदूषण रोखणे आवश्यक आहे.
- शिवाजी येडे, पशुपालक, केत्तूर
गेल्या काही वर्षांपासून उजनीचे पाणी प्रत्येक वर्षी प्रदूषित होत असताना शासन मात्र एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहात आहे. एकेकाळी पिण्यायोग्य असलेले पाणी आता मात्र हातात घेण्यासही लायक राहिले नाही, ही शोकांतिका आहे.
- ऍड. अजित विघ्ने, केत्तूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.