कॉपी बहाद्दर पठ्ठ्याने बुटात लपवला मोबाइल; ४०३ कॉपी बहाद्दर १ ते ३ वर्षे परीक्षेला मुकणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सुरु असलेल्या सत्र परीक्षेत आतापर्यंत ४०३ कॉपी बहाद्दर पकडले आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच वर्णनात्मक स्वरूपात परीक्षा सुरु आहे. उत्तीर्ण होण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याची माहिती विद्यापीठाने दिली.
 exam
examesakal
Updated on

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सध्या सुरु असलेल्या सत्र परीक्षेत आतापर्यंत ४०३ कॉपी बहाद्दर पकडले गेले आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच वर्णनात्मक स्वरूपात ही परीक्षा सुरु आहे. उत्तीर्ण होण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याची माहिती विद्यापीठाने दिली.

सोलापूर विद्यापीठातील कॅम्पससह संलग्नित १०९ महाविद्यालयांमधील जवळपास ७८ हजार विद्यार्थ्यांची सध्या सत्र परीक्षा सुरु आहे. २ फेब्रुवारीपासून विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. तरीदेखील विद्यापीठाने परीक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरुच ठेवली. आतापर्यंत बीए, बीएस्सी, बी-कॉम, बीबीए, बीसीए प्रथम व तृतीय (अंतिम) वर्षाची आणि बी-टेक, फार्मसी, बीई-आर्किटेक्चर, एमए, एमएससी, एमकॉम, एमबीए या विद्यार्थ्यांची देखील परीक्षा संपली आहे.

आता १६ फेब्रुवारीपासून त्या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची परीक्षा सुरु आहे. अभियांत्रिकी परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. दरम्यान, कोरोना काळात सलग दोन वर्षे ऑनलाइन परीक्षा पार पडली. त्यात सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले. परीक्षा ऑनलाइन असल्याने कॉपी करताना पकडण्याचा विषयच आला नाही. पण, आता मात्र या सत्र परीक्षेत कॉपी करणाऱ्या ४०३ विद्यार्थ्यांना भरारी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. आता त्यांनी कॉपीमधील किती मजकूर लिहला, त्यावरून शिक्षा ठरणार आहे.

लॅपसेस कमिटीचा प्रमुख कोण?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या जवळपास ५५ ते ५८ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा आतापर्यंत संपली आहे. आणखी १८ ते २० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. परीक्षा संपल्यानंतर निकालापूर्वी लॅपसेस कमिटीच्या माध्यमातून कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्णय घेतला जातो. पण, सध्या त्या कमिटीचे प्रभारी प्रा. एस. के. पवार आहेत. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पुढील आठवड्यात या कमिटीचा नूतन अध्यक्ष निश्चित केला जाणार आहे. त्यासाठी अनेकजण इच्छुक असून आता तेथे कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे.

पठ्ठ्याने, बुटात लपवला मोबाईल

कॉपीमुक्त परीक्षेसाठी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. शिवकुमार गणपूर हे शहरातील एका नामवंत महाविद्यालयात पडताळणीसाठी गेले. त्याठिकाणी ५० विद्यार्थ्यांच्या हॉलमध्ये ते सर्वात मागे उभे होते. त्यावेळी कोपऱ्यातील एका मुलाची हालचाल संशयास्पद वाटली आणि डॉ. गणपूर यांनी त्याची पडताळणी केली. कॉपी सापडलीच नाही, तरीपण तो संशयास्पद हालचाल का करीत होता, असा प्रश्न डॉ. गणपूर यांच्या मनात होताच. शेवटी त्यांनी बूट काढायला सांगितले, तेव्हा त्याने एकच बूट काढला. दुसरा बूट काढल्यावर त्यात लपवून ठेवलेला मोबाईल सापडला. ‘एमएससी‘मधील फिजिक्स विषयाच्या पेपरवेळी हा प्रकार झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()