सोलापूर : शहरात आज नव्या 42 रुग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. एमआयडीसी परिसरातील अनिता नगरातील 55 वर्षीय पुरुष तर विजयपूर रोडवरील सैफूल परिसरातील 70 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी घेतला आहे. मागील काही दिवसांत शहरात सरासरी शंभरपेक्षा अधिक रुग्ण सापडत होते. मात्र, आता 50 ते 55 च्या सरासरीने रुग्ण आढळत आहेत.
राघवेंद्र नगर (विडी घरकूल), रविंद्र नगर (आकाशवाणी केंद्राजवळ), प्रताप नगर (विजयपूर रोड), विजया हौसिंग सोसायटी (कुमठे), स्वामी विवेकानंद नगर, थोबडे वस्ती (देगाव नाका), मल्लिकार्जुन नगर (उत्तर कसबा), बुधवार पेठ, सिव्हिल क्वार्टर, सिध्देश्वर हौसिंग सोसायटी (भवानी पेठ), वसंत विहार फेज-दोन, न्यू पाच्छा पेठ, लोणार गल्ली, दक्षिण कसबा, दुरवांकुर बॅंक कॉलनी (इंदिरानगर), दाजी पेठ, हरिपदम रेसिडेन्सी, संजीता अपार्टमेंट, हरेकृष्ण विझर, गुलमोहर अपार्टमेंट, काडादी चाळ, तृप्ती कॉर्नरजवळ (मोदी), सुरवसे नगर (कुमठा नाका), आदित्य नगर (आरटीओजवळ), चेतक सोसायटी (मुरारजी पेठ), साठे-पाटील वस्ती, लक्ष्मी विष्णू चाळ, शास्त्री नगर आणि मुरारजी पेठ या परिसरात आज नवे रुग्ण सापडले आहेत.
प्रभाग समित्यांनी थोपविला कोरोना
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील सात पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यानुसार महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या माध्यमातून शहरात प्रभागनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या. त्या समिती सदस्यांना बैठका घेणे, ऍन्टीजेन टेस्ट असो की कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मदत केली. नगरसेवकांनीही त्यांच्या त्यांच्या प्रभागातील नागरिकांची सुरक्षितता म्हणून ऍन्टीजेन टेस्ट करुन घेण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वत: लक्ष घालून अधिकाधिक नागरिकांच्या रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करुन घेतल्या. त्यामुळे शहरातील मृत्यूदर आणि कोरोना संसर्ग कमी होण्यास मदत झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
ठळक बाबी...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.