सोलापूर ग्रामीणमध्ये आठवड्यात वाढले 3312 कोरोना रुग्ण

corona in beed
corona in beedcorona in beed
Updated on
Summary

माळशिरस, पंढरपूर, माढा व सांगोला व करमाळा या तालुक्‍यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

सोलापूर: शहरातील कोरोनाचा जोर कमी झाल्याचा दिलासा असतानाच ग्रामीणमधील रुग्णवाढीने प्रशासनाची झोप उडविली आहे. 1 ते 7 ऑगस्ट या आठवड्यात ग्रामीणमध्ये तब्बल तीन हजार 312 रुग्ण वाढले आहेत. त्यात माळशिरस, पंढरपूर, माढा व सांगोला व करमाळा या तालुक्‍यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

corona in beed
दारुड्या बापानेच अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

नागरिकांना कोरोनाच्या अनुषंगाने मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचा वापर करा, असे प्रशासनाने वारंवार आवाहन केले. मात्र, सर्रासपणे लोक मास्क वापरत नाहीत, मास्क जवळ असतानाही तो चेहऱ्यावर दिसत नाही. विनाकारण घराबाहेर पडणे, गर्दीत गेल्यानंतरही नियमांचे पालन होताना दिसत नाही. विशेषत: ग्रामीणमधील पाच तालुक्‍यांमध्ये तसा प्रकार सर्वाधिक पहायला मिळतो. अक्‍कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा या तालुक्‍यांमधील संसर्ग आटोक्‍यात आला आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी पाच तालुक्‍यांमधील विशेषत: माळशिरस, पंढरपूर व माढ्यातील रुग्णवाढीने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

corona in beed
60 पेक्षा जास्त गावांत उभारली वृक्षारोपणाची चळवळ

देशात रुग्णवाढ होणाऱ्या जिल्ह्यात सोलापूरचा समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर आता त्याठिकाणी कडक निर्बंध लागू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याची भूमिका घेतली आहे. शनिवारी शहरात 11 तर ग्रामीणमध्ये 545 रुग्णांची वाढ झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे ग्रामीणमधील नऊ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ग्रामीणमध्ये अक्‍कलकोट तालुक्‍यात एक, बार्शीत 44, करमाळ्यात 67, माढ्यात 97, माळशिरसमध्ये 96, मंगळवेढ्यात 14, मोहोळ तालुक्‍यात 30, उत्तर सोलापुरात दोन, पंढरपूर तालुक्‍यात 141, सांगोल्यात 57 आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यात तीन रुग्ण वाढले आहेत.

corona in beed
भांबेवाडीमध्ये बिबट्याचा शेतातील रस्त्यावरच ठिय्या

ऑगस्टमधील रुग्णवाढ

ग्रामीणमधील माळशिरस (778), पंढरपूर (744), माढा (611), करमाळा (342), सांगोला (342), बार्शी (219), मोहोळ (172), दक्षिण सोलापूर (19), उत्तर सोलापूर (11) आणि अक्‍कलकोट (6) तालुक्‍यात अशी रुग्णवाढ ऑगस्टमध्ये झाली आहे. दुसरीकडे ऑगस्टमध्ये शहरात 56 रुग्णांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.