तरुण ठरताहेत कोरोनाचे बळी ! 17120 रुग्णांवर सुरू आहेत उपचार

कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत आहे
Corona
CoronaEsakal
Updated on

सोलापूर : जुळे सोलापुरातील चंद्रलोक नगर (आयएमएस शाळेजवळ) परिसरातील 17 वर्षीय मुलाचा कोरोनाने (Covid-19) बळी घेतला आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याला 9 मे रोजी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याला 12 मे रोजी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. तरीही, 15 मे रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Corona mortality is on the rise among young people)

Corona
अकरावी प्रवेशासाठी सीईटी ! शिक्षण विभागातर्फे स्वतंत्र समिती

शहरात आतापर्यंत तीन लाख 11 हजार 549 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. रविवारी एक हजार 709 संशयितांपैकी 69 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण रूग्णसंख्या आता 27 हजार 496 झाली असून त्यापैकी एक हजार 296 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत शहरातील 972 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, शहरातील मृत्यू व रुग्णसंख्या आता आटोक्‍यात येऊ लागली आहे. विशेष म्हणजे शहरातील 12, 14, 17 आणि 18 या प्रभागांमध्ये मागील दोन दिवसांत एकही रुग्ण आढळलेला नाही. तसेच आज 8, 9, 11 या प्रभागांमध्ये एकही रुग्ण सापडला नाही. को- मॉर्बिड व आजार अंगावर काढणाऱ्यांचे प्रमाण मृतांमध्ये सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन केल्याने शहरातील परिस्थिती सुधारत आहे. कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हाताची स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे.

Corona
'तू तर पेंडेमिकमधील सर्वांत मोठी आशा !'

कोरोनाची दुसरी लाट आटोक्‍यात येण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. 23 एप्रिलपासून केलेल्या कडक संचारबंदीनंतरही ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या कमी झालेली नाही. अनेक तरूणांचा (घरातील कर्त्या पुरुषांचा) कोरोनाने बळी घेतला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील मोहोळ, अक्‍कलकोट, पंढरपूर, करमाळा, माढा, बार्शी, सांगोला या तालुक्‍यात मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे. आज अक्‍कलकोट तालुक्‍यात 55, करमाळ्यात 170, माढ्यात 207 रुग्ण वाढले असून या तालुक्‍यात प्रत्येकी चार रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर मोहोळ तालुक्‍यात 86, बार्शीत सर्वाधिक 430 रुग्णांची वाढ झाली असून या तीन तालुक्‍यातील प्रत्येकी पाच रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. पंढरपूर तालुक्‍यात 348 रुग्ण वाढले असून आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मंगळवेढ्यात 289 रुग्ण वाढले असून दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 32 रुग्ण वाढले आहेत. या तालुक्‍यातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर सांगोल्यात 262 रुग्ण वाढले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची सद्य:स्थिती...

  • एकूण टेस्ट : 12,79,214

  • एकूण बाधित : 1,32,011

  • कोरोनाचे बळी : 3,520

  • ऍक्‍टिव्ह रुग्ण : 17,120

  • बरे झालेले रुग्ण : 1,11,371

कोरोनाचे तरुण ठरताहेत बळी

कोरोनामुळे रविवारी ग्रामीण भागातील 11 महिला तर 26 पुरुषांचा मृत्यू झाला आहे. त्यात गुळपोळी (ता. बार्शी) येथील 29 वर्षीय तरुणाचा तर हिंगणी (ता. मोहोळ) येथील 35 वर्षीय तरुणाचा, मांगी (ता. करमाळा) येथील 35 वर्षीय तरुणाचा आणि बावी (ता. माढा) येथील 33 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. आजार अंगावर न काढता रुग्णांनी लक्षणे असल्यास वेळेत निदान करून घ्यावे, नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

शहरात टेस्टच्या संख्येत घोळ

शहरातील एक हजार 794 संशयितांची टेस्ट रविवारी (ता. 16) केल्याची नोंद महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले. मात्र, शहरात रविवारी आढळलेल्या एकूण बाधित रुग्णांची माहिती देताना एक हजार 709 संशयितांचीच चाचणी झाल्याचे सांगण्यात आले. प्रलंबित रिपोर्ट कोणाचाही नसल्याचेही अहवालात दर्शविण्यात आले आहे. महापालिकेच्या या अहवालावरून पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाची नोंद दोन-तीन दिवसांनी रिपोर्टमध्ये करण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.