कोरोना झालेल्यांना तीन महिन्यानंतरच बूस्टर डोस! जाणून घ्या निकष

कोरोना झालेल्यांना तीन महिन्यानंतरच बूस्टर डोस! जाणून घ्या निकष
कोरोना झालेल्यांना तीन महिन्यानंतरच बूस्टर डोस! जाणून घ्या निकष
कोरोना झालेल्यांना तीन महिन्यानंतरच बूस्टर डोस! जाणून घ्या निकषSakal
Updated on
Summary

ज्या व्यक्‍तींनी प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण केले आहेत, त्यांना आजपासून (सोमवारी) संरक्षित (बूस्टर) डोस टोचला जाणार आहे.

सोलापूर : ज्या व्यक्‍तींनी Covid-19 प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण केले आहेत, त्यांना आजपासून (सोमवारी) संरक्षित (बूस्टर) डोस (Booster Dose) टोचला जाणार आहे. सोलापूर शहरातील हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील को-मॉर्बिड व्यक्तींना तो डोस दिला जाणार आहे. कोरोना बाधित रुग्णाला तीन महिन्यांनंतर बूस्टर डोस दिला जाईल, असेही आरोग्य विभागाने (Health Department) स्पष्ट केले आहे. (Corona sufferers will be given a booster dose only after three months)

कोरोना झालेल्यांना तीन महिन्यानंतरच बूस्टर डोस! जाणून घ्या निकष
सोलापूर जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची सुरवात! 9 दिवसांत 440 रुग्ण

संरक्षित लस घेण्यासाठी संबंधित व्यक्‍तीने दोन्ही डोस घेऊन किमान 39 आठवड्यांचा कालावधी पूर्ण करणे आवश्‍यक आहे. दोन्ही वेळी जी लस टोचली आहे, त्याच लसीचा डोस घेणे बंधनकारक आहे. कॉकटेल डोस देण्यास अजूनही सुरवात झालेली नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी लसीची वर्धक मात्रा सर्वांनीच घ्यावी, असे आवाहन केंद्र सरकारच्या (Central Government) वतीने करण्यात आले आहे. महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी महापालिका परिसरातील कोविड कंट्रोल रूममध्ये (Covid Control Room) सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील 14 नागरी आरोग्य केंद्रामध्ये, रेल्वे हॉस्पिटल (Railway Hospital), विमा रुग्णालय (ESI Hospital), एसआरपीएफ कॅम्प (SRP Camp) व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) 18 वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड (Covishield) लसीचा पहिला पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच त्या ठिकाणी ऑनलाइन व ऑन द स्पॉट बूस्टर डोस देण्याचीही सोय करण्यात आली आहे. दरम्यान, पूर्वीचे डोस घेताना ज्या मोबाईल क्रमांकावरून नोंदणी केली आहे, तोच क्रमांक सांगावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, दोन्ही डोस घेऊन ज्यांचे नऊ महिने पूर्ण होतील, त्यांना बूस्टर डोस दिला जाणार आहे.

कोरोना झालेल्यांना तीन महिन्यानंतरच बूस्टर डोस! जाणून घ्या निकष
सरकारचे नवे आदेश! महापालिकांमधील 'या' अधिकाऱ्यांची मागवली माहिती

कोरोना बाधितांना तीन महिन्यांनंतर बूस्टर

दोन डोस घेतलेला व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आलेला असल्यास त्यास तीन महिन्यांनंतर बूस्टर डोस दिला जाणार आहे. तर 60 वर्षांवरील को-मॉर्बिड व्यक्‍तींना बूस्टर डोस घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्‍टरांची संमती घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे नाही. दरम्यान, बूस्टर डोस घेतल्यानंतरही सर्वांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गर्दीत न जाणे व हाताची स्वच्छता राखणे हे नियम पाळावेच लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()