सोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने(solapur corona update ) आरोग्य यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या(solapur administration) माध्यमातून मोठी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये १२५ तर शहरात पहिल्या टप्प्यात सात कोविड केअर सेंटर(covid care center) उभारले जात आहेत. त्याठिकाणी एकाचवेळी दहा-पंधरा हजार रुग्णांवर उपचार होतील. दरम्यान, शहर-ग्रामीणमधील प्रत्येक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर आता संशयितांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, माळशिरस, सांगोला, पंढरपूर या तालुक्यातील जवळपास ४० ते ५५ गावांमध्येच रुग्ण अधिक वाढतात, असा दोन्ही लाटेतील अनुभव आहे. त्या गावात पुन्हा कोरोना वाढणार नाही, यादृष्टीने ठोस नियोजन केले जात आहे. शहरातही पुन्हा एकदा शिक्षकांच्या मदतीने घरोघरी जाऊन सर्व्हे केला जाणार असून त्यादृष्टीने महापालिकेचे नियोजन सुरु आहे. ग्रामीणमधील १४० गावांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले असून १०० टक्के लसीकरणावर भर दिला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील नऊ लाख ७७ हजार ९३२ मुलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी २२४ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुर्धर आजार असलेल्या (४ डी) मुलांना हेल्थ कार्ड देऊन त्यांची दर आठवड्याला वैद्यकीय तपासणी होईल. ग्रामीणमधील संसर्ग रोखण्यासंदभात उद्या (बुधवारी) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे वैद्यकीय अधिकारी, गावचे सरपंच आदी अधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन बैठक घेणार आहेत.
शहरात सात ठिकाणी उभारणार कोविड केअर सेंटर
शहरातील कोरोना बाधित रुग्णांसाठी (कोणतीही लक्षणे नसलेले) केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे एक दिवसांत कोविड केअर सेंटर(covid care center) सुरु केले जाणार आहे. वाडिया हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड केअर सेंटर उभारले जात असून त्याठिकाणी १०० बेड्स असतील. बॉईज हॉस्पिटलमध्येही सद्यस्थितीत ४३ पर्यंत रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण वाढून हे सेंटर ५० टक्के भरल्यानंतर पुढील टप्प्यात सिंहगड अभियांत्रिकी कॉलेज, होटगी रोडवरील काडादी मंगल कार्यालय, डब्ल्यूआयटी कॉलेजची इमारत, विद्यापीठाचे वसतीगृह, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची इमारत व म्हाडाची इमारतही कोविड केअर सेंटरसाठी घेतली जाईल, अशी माहिती आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी दिली.
‘या’ ठिकाणी हवेतून ऑक्सिजन प्लान्ट
करमाळा, पंढरपूर व अकलूज उपजिल्हा रुग्णालय, माळशिरस ग्रामीण रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात चार तर विमा रुग्णालय आणि बॉईज हॉस्पिटल या ठिकाण हेवेतून ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प तयार केले आहेत. ११.५१ मे.टन ऑक्सिजन त्याठिकाणी एकाच दिवशी तयार केला जाऊ शकतो. तर संपूर्ण जिल्ह्यात १४०.२२ मे.टन ऑक्सिजन(oxgyen tank) एकाचवेळी साठवू शकतो, एवढी क्षमता निर्माण केली आहे. सध्या सर्व टॅंक ऑक्सिजनने भरून घेतले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.