अक्कलकोट - अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथे घराच्या पाठीमागील बाजरीचे शेत राखण करण्याकरिता जात असताना विजेच्या खांबाची पडलेली तार उचलून बाजूला करत असताना विजेचा स्पर्श झाल्याने धक्का बसून ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
तर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्या पत्नीलाही शॉक बसून तिचाही मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. याची अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात अकस्मात नाहीत म्हणून झालेली आहे.