सोलापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात कोव्हिड केअर सेंटर (Covid Care Center) सुरू झाले आहेत. 55 ठिकाणी सेंटर सुरू झाले असून सेंटर सुस्थितीत चालत आहेत का?, काही अडचणी असल्यास या सेंटरला भेट देऊन पाहणी करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (CEO Dilip Swami) यांनी केली आहे. (Covid centers in the district will now be inspected suddenly)
त्यानुसार प्रत्येक सेंटरसाठी एक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना तपासणीबाबत प्रशिक्षण, कोव्हिड नियमावली समजावून सांगितली जाणार आहे. तालुक्यातील सेंटर तपासणीसाठी एक दिवस व वेळ निश्चित करून त्या दिवशी अचानकपणे तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. सेंटरमधील परिस्थितीचा आढावा घेणे, मार्गदर्शक तत्त्वानुसार सेंटर चालतात की नाही हे पाहणे, सेंटरमध्ये नाश्ता व जेवण योग्य मिळतो का, औषधे व इतर सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत का, ताण - तणाव व्यवस्थापन कार्यशाळा सक्षम झाली आहे की नाही, सेंटरसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था, ग्रामपंचायतीचे काम करणारे कर्मचारी यांना भेटून त्यांचे अभिनंदन करणे व मनोबल वाढवणे, महिला अधिकारी व कर्मचारी महिला रुग्णांसाठी काम करतात की नाही, बेडची क्षमता, सध्याची रुग्णसंख्या, डॉक्टर व स्टाफ आहे का, पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, औषधे पुरेशा प्रमाणात आहेत का याबाबतची पाहणी केली जाणार आहे.
गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, उपअभियंता आदी अधिकाऱ्यांच्या या कामासाठी नियुक्त्या केल्या जाणार आहेत. अधिकारी कमी पडत असल्यास तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या नियुक्तीसंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मदतीने नियुक्त्या कराव्यात, अशी सूचनाही सीईओ स्वामी यांनी जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांना व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.