‘माकप’च्या आडम मास्तरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट! प्रणिती शिंदे खासदार झाल्या अन्‌ त्यांच्या विधानसभा मतदारसंघावर शिवसेना, राष्ट्रवादी, माकपने केला दावा

‘माकप’चे माजी आमदार नरसय्या आडम यांनी आज (सोमवारी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. बैठकीतील चर्चेवर मास्तरांनी ‘नो कॉमेंट असे उत्तर दिले आहे.
Adam Mastar.jpeg
Adam Mastar.jpegmakap
Updated on

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगूल सप्टेंबरमध्ये वाजणार आहे. तत्पूर्वी अनेक इच्छुक आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून राजकीय समिकरणांची जुळवाजुळव करीत आहेत. तर दुसरीकडे पक्षश्रेष्ठींकडे इच्छा देखील व्यक्त करीत आहेत. ‘माकप’चे माजी आमदार नरसय्या आडम यांनी आज (सोमवारी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. बैठकीतील चर्चेवर मास्तरांनी ‘नो कॉमेंट असे उत्तर दिले आहे.

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे ‘शहर मध्य’ या त्यांचा मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार?, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पण, दुसरीकडे या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार हे जवळपास निश्चित आहे. त्याअनुषंगाने माजी आमदार आडम यांनी काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन तेथून उमेदवारीची मागणी केली आहे. त्यानंतर त्यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे तज्ज्ञ मार्गदर्शक धर्मराज काडादी यांचीही भेट घेऊन चर्चा केली.

तत्पूर्वी, त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमवेत देखील यासंदर्भात चर्चा केली होती. आता त्यांनी सोमवारी (ता. २२) थेट ‘मातोश्री’ गाठत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. आपण आमदारकीला इच्छुक असून मला उमेदवारी मिळावी हाच भेटीचा उद्देश असावा, अशी चर्चा आहे. पण, मास्तरांनी त्यासंदर्भात बोलण्यास नकार देत भेट गोपनीय असल्याचे सांगितले.

‘शहर मध्य’वर सर्वांचाच दावा

मोची व मुस्लिम समाजाने ‘शहर मध्य’मधून उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी मदत केली होती. आता त्या खासदार झाल्याने त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यावर माजी आमदार आडम मास्तर ठाम आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.