Solapur Crime : खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी अशा १२ गुन्ह्यानंतर फरार! वेशांतर करून पोलिसांनी आरोपीला केली अटक

पोलिसांनी ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
solapur crime
solapur crimesakal
Updated on

सोलापूर : खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी अशा विविध १२ गुन्ह्यांतील ‘पाहिजे’ संशयित आरोपी आल्या ऊर्फ आण्या सुरेश काळे (रा. दत्तनगर, मोहोळ) यास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेडशीट विक्रेता बनून जेरबंद केले. त्याच्याकडून पोलिसांनी ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बरूर येथे २१ एप्रिलच्या मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी करून साडेआठ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. साहेबलाल हुसेनी शेख यांनी मंद्रूप पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी तातडीच्या तपासाचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या नेतृत्वाखालील पथक नेमले.

या पथकाने मोहोळ एसटी स्टॅन्ड परिसरातून संशयित आरोपी आल्या काळेला पकडले. औराद, कंदलगाव, गुंजेगाव, भंडारकवठे, टाकळी, आटपाडी, सांगली येथे घरफोडी, चोरी केल्याचे त्याने सांगितले. त्याला मंद्रूप पोलिसांच्या ताब्यात देऊन बरूर घरफोडीचा तपास सुरु आहे.

त्याच्यावर अक्कलकोट उत्तर पोलिसात चार, अक्कलकोट दक्षिण पोलिसांत तीन, मोहोळ पोलिस ठाण्यात सहा गुन्हे नोंद आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके, सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, पोलिस अंमलदार नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अनिस शेख, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, समीर शेख, महिला अंमलदार ज्योती काळे, मोहिनी भोगे यांच्या पथकाने पार पाडली.

पोलिस असल्याचा संशय आला, पळायचीही तयारी, पण...

काही महिन्यांपूर्वी सनीदेओल सुरेश काळे या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करून चोरीच्या गुन्ह्यातील ४० तोळे सोन्याचे दागिने व दोन रिव्हॉल्वर जप्त केल्या होत्या. त्याचाच भाऊ हा आल्या काळे आहे. गुन्हा केल्यावर तो एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात होता. पोलिसांना तो सापडतच नव्हता.

दोन दिवसांपूर्वी तो मोहोळमध्ये असल्याची खबर मिळताच सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके यांचे पथक तेथे पोचले. राजस्थानी बेडशिट विक्रेत्यांना थांबून पोलिसांनी वेशांतर केले आणि त्यांच्याच दुचाकीवरून आल्या काळेपर्यंत गेले. पोलिस हवालदार भैय्या गायकवाड यांची दाढी वाढल्याने त्याला फार संशय आला नाही.

तरीपण, तो पळून जायच्या तयारीत असताना दुचाकीवर मागे बसलेले श्री. शेळके यांनी झडप मारत त्याला पकडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()