Solapur News : मोहोळ तालुक्यात गुन्ह्यात झाली घट

मोहोळ तालुक्यात भाऊबंदकी व गावागावातील राजकारणामुळे एकमेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण जास्त आहे.
mohol
moholesakal
Updated on

मोहोळ : मोहोळ तालुका तसा राज्याच्या नकाशावरचा व संवेदनशिल तालुका. मुंबई-हैदराबाद महामार्गावरील मुख्य केंद्रबिंदू. तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा मार्ग व पालखी मार्ग मोठ्या प्रमाणात गेल्याने गुन्हेगारांना गुन्हा करून पळून जाण्यासाठी या ठिकाणी मोठा वाव आहे. खोट्या केसेसही दाखल होण्याचे प्रमाण या ठिकाणी बऱ्यापैकी आहे. मात्र पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या बारकाईने ‘व्हेरिफाय’ करण्याच्या पद्धतीमुळे २०२२ मधील गुन्ह्यापेक्षा चालू २०२३ मध्ये विविध गुन्ह्यात मोठी घट झाली आहे.

मोहोळ तालुक्यात भाऊबंदकी व गावागावातील राजकारणामुळे एकमेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच शाळा व महाविद्यालय, बसस्थानक परिसरात शाळा सुटल्यानंतर मुलींची छेड काढणे, मोटारसायकलवर वेगाने जाणे, अश्लील हावभाव करणे हे प्रकार सुरूच होते.

यावर तोडगा म्हणून पोलिस निरीक्षक घुगे यांनी शहरासह ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयाला भेटी देण्याचा सपाटा लावला आहे.ते शाळेत जाऊन विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रबोधन करतात. शालेय जीवनात किंवा विद्यार्थी दशेत गुन्हे दाखल झाले तर त्याचे भविष्यात काय दुष्परिणाम होतात, तसेच कायद्याबाबत मार्गदर्शन करतात.

त्यांनी त्यांचा स्वतःचा मोबाईल नंबर थेट मुलींना दिल्याने छेडछाड करणाऱ्यांना चाप बसला आहे. तसेच त्यांनी काही पोलिसांचे ही मोबाईल नंबर मुलींना दिल्याने कॉलेजकुमार टरकले आहेत.

mohol
Solapur Barshi News : बार्शी तालुक्यातील पेरण्या पूर्णत्वाकडे; मात्र नदी, नाले कोरडेच

२०२२ मध्ये जूनअखेर विविध प्रकारचे ४१४ गुन्हे दाखल होते. २०२३ मध्ये जून अखेर ३१४ गुन्हे दाखल आहेत म्हणजे या गुन्ह्यात १०० ने घट झाली आहे. एखादा नागरिक गुन्हा दाखल करावयास आला तर त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केल्याने व नंतर"व्हेरिफाय" केल्याने त्याची तक्रार खरी की खोटी याचा अंदाज येतो. ज्याची तक्रार खरी आहे,

mohol
Solapur news : उद्योग-व्यवसायातून महिलांनी स्वतःचा विकास करावा; डॉ. नभा काकडे

तो त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देतोच. मात्र ज्याची तक्रार खोटी आहे, त्याच्यावर प्रश्नाचा भडिमार केला तर तो शक्यतो पुन्हा येत नाही. २०२२ मध्ये दारूबंदीच्या ९१ केसेस दाखल होत्या. त्या चालू वर्षी ११४ झाल्या आहेत. २०२२ मध्ये चोऱ्या ९८ झाल्या होत्या. त्या चालू वस्ती ७८ झाल्या आहेत. विशेष म्हणजे ज्याची तक्रार द्यावयाची आहे, त्यानेच फक्त एकट्याने पोलिस ठाण्यात यायचे, इतरांनी मध्यस्थी करावयाची नाही ही पद्धत अवलंबली आहे.

mohol
Solapur Accident News : सोलापूर जिल्ह्यात सहा महिन्यांत ३९१ जणांचा अपघातात मृत्यू

बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या असल्याचेही पोलिस निरीक्षक घुगे यांनी सांगितले. शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारे शहराच्या मुख्य रस्त्यावरील विविध व्यवसायिकांचे रस्त्यावर लावलेले "स्टॅन्ड बोर्ड" काढल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

तसेच शहरातील रिक्षा चालकांनाही ड्रेस कोड दिल्याने त्यांनाही शिस्त लागली आहे. सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांच्या सहकार्याने लोकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा माझा प्रयत्न असल्याचे घुगे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()