तू अपशकुनी आहेस, दवाखाना बांधण्यासाठी माहेरून पैसे आण म्हणत उपाशी ठेवले. अडीच वर्षांच्या मुलीला हिसकावून घेतले आणि मला हाकलून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
सोलापूर : दवाखाना बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी स्नेहल रूपेश मंगवडे (रा. वैष्णवी नगर, सैफुल) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पती रूपेश मंगवडे, रंजना दिलीप मंगवडे, समिता किसन जगताप (सर्वजण रा. बार्शी रोड, कुर्डुवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (Crime news in and arround Solapur city area)
स्नेहलला तू घरात व्यवस्थित राहात नाही, तुला स्वयंपाक येत नाही, तुझ्या आई-वडिलांनी लग्नात मानपान व्यवस्थित केला नाही, असे बोलून मारहाण केली. तू अपशकुनी आहेस, दवाखाना बांधण्यासाठी माहेरून पैसे आण म्हणत तिला उपाशी ठेवले. स्नेहलच्या अडीच वर्षांच्या मुलीला हिसकावून घेतले आणि स्नेहलला हाकलून दिले, असेही फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार चव्हाण हे करीत आहेत.
मुलांकडे लक्ष देत नाही म्हणत पतीने पत्नीला बदडले
मुलांच्या सायकल खेळण्याचा कारणावरून पतीने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी पतीविरुद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. होटगी रोडवरील ब्रह्मदेव नगरात ही घटना घडली. अनिता अनंतराव खरात यांनी पोलिसांत पतीविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार पती अनंतराव सखाराम खरातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी अनिता या घरी बसलेल्या असताना पती अनंतराव हे कामावरून घरी आले. त्यांच्या मुलाने खेळायला सायकल मागितली. त्यानंतर अनंतराव यांनी पत्नी अनिता हिला, तुझे पोरांकडे लक्ष नाही, पोरांचे ऑनलाइन क्लास चालू असून ते अभ्यास करीत नाहीत. फक्त सायकल खेळायला मागतात, असे म्हणून पत्नीला व मुलांना शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्यांनी उलतण्याने डोक्यात मारहाण करून जखमी केले. तसेच माझ्या मुलांना चाकूने मारून टाकतो, अशी धमकी दिली, असेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस हवालदार लोहार हे पुढील तपास करीत आहेत.
कारखान्यातून 37 हजारांची चोरी
बंद असलेल्या कारखान्याचे गेट तोडून कारखान्यातील वायरिंग व लूमचे साहित्य चोरून नेल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नरेश यंत्रमाग औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था कारखाना, अक्कलकोट रोड परिसरातील समाधान नगरात ही घटना घडली. या प्रकरणी राजाभाऊ राजेंद्र पवार (रा. हांडे प्लॉट, जुना पूना नाका) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार योगेश राजेंद्र मकाई (रा. सुनिल नगर), निजगुण मल्लिकार्जुन मस्के (रा. कीर्ती नगर, अक्कलकोट रोड), रमेश महादेव हिरेमठ (रा. अभिषेक नगर, अक्कलकोट रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार काळे हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.