वारी काळात पंढरपूरसह परिसरातील नऊ गावांमध्ये 17 जुलै ते 25 जुलैपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.
सोलापूर : पंढरपुरात (Pandharpur) आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे (Covid-19) निर्बंध घालण्यात आले असून, वारी काळात पंढरपूरसह परिसरातील नऊ गावांमध्ये 17 जुलै ते 25 जुलैपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर 18 जुलै ते 25 जुलै या कालावधीमध्ये चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Curfew in Ashadhi Wari in Pandharpur from 17th to 25th July)
आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे सावट आहे. आळंदी आणि देहूहुन या आधीच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांसह मानाच्या पालाख्यांनी मोजक्याच वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातही वारीची तयारी सुरू आहे. याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, येत्या 20 जुलैला आषाढी वारीचा मुख्य सोहळा होत आहे. या वारीसाठी वाखरी येथे मानाच्या दहा पालख्या 19 जुलैला येणार आहेत. तिथून प्रतीकात्मक पायी वारीसाठी इसबावीपर्यंत चाळीस-चाळीसच्या दहा गटांमध्ये हे वारकरी येणार आहेत. तिथून पुढे प्रत्येक पालखीचे दोन प्रतिनिधी असे एकूण 20 वारकरी पुढचे साडेचार किलोमीटर पायी चालत येणार आहेत. तर उर्वरित 380 लोक आपापल्या वाहनांमध्ये आपापल्या मठांकडे प्रस्थान करणार आहेत. यासाठी पोलिस प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका आणि शहर अशी त्रिस्तरीय नाकाबंदी लावण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा
परंपरेप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते 20 जुलैला आषाढी वारीची शासकीय महापूजा पार पडेल. या वेळी मंदिरात केवळ 50 लोकच उपस्थित असतील. तसेच वारी काळात येणाऱ्या मानाच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.