दरम्यान, नुकसानीच्या पाणीसाठी आ. समाधान आवताडे यांनी सकाळच्या सत्रात तर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सायंकाळच्या सत्रात बाधित ठिकाणी भेटी दिल्या आहेत.
मंगळवेढा : अवकाळी पाऊस व वादळामुळे तालुक्यातील (Mangalvedha Crop Damage) 42 गावे बाधित झाली असून 27 मे रोजी केलेल्या पाहणीमध्ये 37.30 हेक्टर पिकांचे, तर 577 घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.
दि. 26 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुटलेल्या वादळ व पावसामुळे तालुक्यामध्ये घरे, फळपिके, जनावरांचे शेड, विजेचे खांब, झाडांचे नुकसान झाले. नुकसानीबाबत तहसीलदार मदन जाधव (Tehsildar Madan Jadhav) यांनी तात्काळ मंडल अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांना सूचना देत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितले.
तालुक्यातील मारापूर, मरवडे, आंधळगाव, बोराळे, भोसे, हुलजंती, मंगळवेढा या आठ महसूल मंडलमधील 67 शेतकरी बाधित असून त्यामध्ये 37.30 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले. पाटकळ मंडळमध्ये सर्वाधिक शेती पिकांचे क्षेत्र सर्वाधिक मारापूर मंडलमधील आहेत. तर, 577 घरांचे अंशतः नुकसान तर तीन घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, त्यामध्ये सर्वाधिक घरे हे आंधळगाव मंडलमधील आहेत. मरवडे मंडलमध्ये एक शेतकरी वीज पडून मयत झाला. अन्य ठिकाणी तीन जनावरे दगावली असून सहा नागरिक जखमी झाले आहेत.
9 शेडनेटचे नुकसान झाले, त्यामध्ये पाठखळ मंडलमधील सात शेतकऱ्यांचा समावेश आहे व 9 शेततळ्याचे नुकसान झाले. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे आंधळगाव मंडलमधील शेतकऱ्यांचे झाले. जनावरांचा चारा म्हणून वापरल्या जाणाऱ्या 4000 कडबा पेंड्याचे नुकसान झाले. हे आकडेवारी 27 मे रोजी केलेल्या पंचनामाचे असून जे कुणी नुकसानीच्या पंचनामा करण्यापासून वंचित आहेत, त्यांनी तात्काळ संबंधित गावचे तलाठी व कृषी सहायक यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार जाधव यांनी केले.
दरम्यान, नुकसानीच्या पाणीसाठी आ. समाधान आवताडे यांनी सकाळच्या सत्रात तर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सायंकाळच्या सत्रात बाधित ठिकाणी भेटी दिल्या आहेत. नुकसानीमध्ये घरांची संख्या अधिक आहे. शासनाकडून घरांच्या नुकसानी पोटी मिळणारी भरपाई तोकडी असते. मात्र, तेवढ्या रकमेत घराची दुरुस्ती करता येत नाही, त्यांना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना व रमाई आवास योजनेतून लाभ द्यावा, अशी मागणी बाधित लाभार्थ्यांमधून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.