मंगळवेढा - मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.आदीच आर्थिक अडचणीत शेतकऱ्यांना दुष्काळात धोंडा महिना सोसावा लागला. वातावरणातील बदलानूसार घ्यावी लागणारी फवारणी, मजूर टंचाई, महागडी औषधे, या फळबाग उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला. शेतात पुरेसे पाणी आहे आणि उत्पन्न हाती लागेल या आशेपोटी ज्वारीच्या व ऊसाच्या शिवारात ज्वारीचे कमी उत्पन्न व ऊसाचे बिले वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून डाळीब व द्राक्ष उत्पादनाचे कल वाढला.
मंगळवेढा, सिध्दापूर, अरळी, ब्रम्हपुरी, नंदूर, मरवडे, सलगर बुभोसे, रड्डे, भाळवणी, तळसंगी, डोणी या ठिकाणी द्राक्ष क्षेत्रात वाढ झाली.पिन बोरर,होल बोरर मुळे डाळीब उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला असताना शासनाने कोणत्याही मदत व केंद्र सरकारचे पॅकेज मिळाले नाही.यंदा द्राक्ष उत्पादकाला काही तरी हाती लागेल अशी आशा होती.त्यासाठी महागड्या दराची औषधे,मजूर टंचाईने मागणीप्रमाणे मजूरी देऊन मजूर उपलब्ध करून बागेची जोपासना केली.त्यात महावितरण सरसकट केलेला खंडीत वीज पुरवठा अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी झाडावर असलेली द्राक्षे मिळेल त्या किमतीला विकली मात्र वातावरणात बदलामुळे द्राक्षे विक्रीस येण्यास विलंब लागला.
राज्यासह परराज्यातील व्यापाऱ्यांनी द्राक्ष बागेच्या पाहणीकडे पाठ फिरवली तरीही तालुक्यातील शेतकऱ्यांनी विक्रीयोग्य झालेली द्राक्षे विकण्यासाठी परराज्यात ठाण मांडले.तरीही द्राक्षे खरेदी करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल होईना,त्यामुळे झाडावर असलेली द्राक्षे काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने गळून पडल्याने झालेली बागेची वाताहात पाहून शेतकऱ्यांचे अवसान गळाले,
दोन वर्ष कोरोनात गेली,यंदा जिद्दीने बाग आणली. व्यापारी येईनात म्हणून द्राक्षे विकण्यासाठी राज्यासह परराज्यात बाजारपेठेचा शोध घेत असताना अचानक आलेल्या पावसाने केलेल्या नुकसानीने शेतीचे आर्थिक गणित कोलमडले.द्राक्ष उत्पादकांना शासनाने दिलासा देण्याची गरज आहे.
- अनिल बिराजदार, द्राक्ष उत्पादक सिध्दापूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.