पद्मशाली समाजाचे दशरथ गोप यांचं ठरलं! शनिवारी ३०० कार्यकर्त्यांसह हैदराबादमध्ये करणार ‘बीआरएस’मध्ये प्रवेश

पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप हे अखेर शनिवारी (ता. ८) हैदराबाद येथे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश करणार आहेत. ३०० कार्यकर्त्यांसह ते हैदराबादला जाणार आहेत.
dashrath gop, solapur
dashrath gop, solapursakal
Updated on

सोलापूर : येथील तेलुगु भाषक समाजातील युवकांच्या हाताला काम आणि त्यांच्या शिक्षणाची हमी देणार असतील तर मी सोलापुरातील तेलुगु भाषक समाजाला एकत्र करून बीआरएस पक्षप्रवेशाचा विचार करेन, अशी भूमिका एप्रिल महिन्यात मांडलेले पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप हे अखेर शनिवारी (ता. ८) हैदराबाद येथे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश करणार आहेत. ३०० कार्यकर्त्यांसह ते हैदराबादला जाणार आहेत.

एप्रिल महिन्यात श्री. गोप यांनी बीआरएस पक्षप्रवेशाचा विचार मांडला होता. त्यानुसार त्यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांची भेटही घेतली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय कळवणार असल्याचे सांगणारे श्री. गोप तीन महिने अज्ञातवासातच गेले. मात्र, मुख्यमंत्री केसीआर आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनाचे निमित्त करून सोलापूरच्या दोनदिवसीय दौऱ्यासाठी अख्ख्या मंत्रिमंडळासह येऊन सोलापूरच्याच नव्हे राज्याच्या राजकारणात वातावरण निर्मिती केली.

यावेळी केसीआर यांनी सोलापुरातील अनेक दिग्गज राजकीय व्यक्तींची भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांना एका मोठ्या सभेत बीआरएसमध्ये आणले. एकूणच त्यावेळी निर्माण झालेल्या बीआरएसच्या वातावरण निर्मितीमुळे अनेक राजकीय नेत्यांची उत्सुकता वाढली तशी गोप यांचीही अस्वस्थता वाढली असणार. त्यामुळे त्यांनी तीन महिन्यांनंतर आता पक्ष प्रवेशाचा मुहूर्त साधला आहे.

मंगळवारी (ता. ४) पद्मशाली शिक्षण संस्थेच्या प्रांगणात शिक्षण संस्थेतील विश्वासू तसेच त्यांना मानणाऱ्या समर्थकांची श्री. गोप यांनी बैठक घेतली. या बैठकीत श्री. गोप यांना पाठिंबा देणाऱ्यांनी आपली नावे कळवावी, तसेच जे समर्थक शनिवारी (ता. ८) हैदराबाद येथे केसीआर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत त्यांनी तयारी करावी, असे ठरले.

३०० कार्यकर्त्यांसह करणार पक्षप्रवेश

पक्षप्रवेशाबाबत विचारले असता, श्री. गोप म्हणाले, ‘आयटी इंडस्ट्री हब’ म्हणून हैदराबादची ओळख आहे. तेथील काही आयटी कंपन्या सोलापुरात याव्यात. आयटी इंडस्ट्रीमुळे येथे इतर व्यवसाय-उद्योगही वाढतील. तसेच सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर मी केसीआर यांना पक्षप्रवेश करणार असल्याची अट ठेवली होती. त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून शनिवारी ३०० कार्यकर्त्यांसह हैदराबाद येथे बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहोत, हे फायनल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.