Crime News: प्रेमविवाहास परवानगी नाकारणाऱ्या वडिलांना मुलीची प्रियकराच्या मदतीने बेदम मारहाण

प्रेमविवाहाला परवानगी न दिल्यामुळे पोटच्या मुलीनेच आपल्या वडिलांना बेदम मारहाण केली आहे
Crime News
Crime NewsEsakal
Updated on

Solapur News : प्रेमविवाहाला परवानगी न दिल्यामुळे पोटच्या मुलीनेच आपल्या वडिलांना बेदम मारहाण केली आहे. प्रियकराच्या मदतीने तिने सर्व कट रचला. काल रात्रीच्या सुमारास माढ्याच्या दशेने जात असताना हा प्रकार घडला आहे. माढ्यातील व्यापारी महेंद्र शहा त्यांची मुलगी आंतरजातीय प्रेमविवाह करू इच्छित होती.

त्याला वडिलांनी विरोध केला होता. ती कामासाठी पुण्याला गेली होती. पुण्यावरून येताना वडील तिला घ्यायला गेले असताना तिने गाडी थांबवली, त्या ठिकाणी तिचा प्रियकर आणि त्याचे काही साथीदार यांनी महेंद्र शहा यांना बेदम मारहाण केली. सध्या तर बेशुद्ध आहेत, त्यांच्यावर सोलापूरमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोमवारी (ता. ७) रात्री साडेदहाच्या सुमारास माढा- शेटफळ रस्त्यावरील वडाचीवाडी (उ.बु) शिवारात त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली होती. महेंद्र शहा असे जखमी व्यापाऱ्याचे नाव असून, याबाबत माढा पोलिस ठाण्यात त्यांच्याच मुलीने फिर्याद दिली होती. परंतु २४ तासांच्या आतच पोलिस तपासात फिर्यादीच संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

माढ्यातील व्यापारी महेंद्र शहा यांची मुलगी साक्षी शहा ही पुण्यावरून शेटफळ येथे आली असल्याने सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास माढा येथून आणण्यासाठी ते गेले होते. तिला घेऊन शेटफळहून माढ्याच्या दिशेने जात असताना वडाचीवाडी (उ.बु) येथील पाण्याच्या टाकीजवळ मुलगी लघुशंकेसाठी थांबली असताना दुचाकीवरून आलेल्या चार अनोळखी लोकांनी महेंद्र शहा यांच्यावर धारदार हत्यारांनी वार केले व हल्लेखोर शेटफळच्या दिशेने पसार झाले.

Crime News
Uddhav Thackeray: ठाकरे गटात पुन्हा मोठा बंड होणार? संभाजीनगरमध्ये पार पडली गुप्त बैठक

जखमी अवस्थेत पडलेल्या महेंद्र शहा यांना साक्षी हिने वडाचीवाडी येथील नागरिकांच्या मदतीने माढ्यातील पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात हलवले, अशी फिर्याद मुलगी साक्षी हिनेच माढा पोलिसात दिली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली माढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक भीमराव खणदाळे, तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एम. एम. शेख यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक बोटे, हवालदार शब्बीर शेख, संजय घोळवे यांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या २४ तासांच्या आत संशयित आरोपींचा शोध घेतला.

Crime News
Ambadas Danve : 'शिवसेना त्या गद्दारांकडं आता ढुंकूनही पाहणार नाही'; दानवेंचा शिंदे गटावर जोरदार प्रहार

पोलिसांच्या तपासात फिर्यादी साक्षी हिनेच आपल्या साथीदारांच्या मदतीने वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील संशयित आरोपी साक्षी शहा, चैतन्य कांबळे, अतिश लंकेश्वर, रामा पवार, बंडू उर्फ आनंद जाधव, मयूर चंदनशिवे (सर्व रा. माढा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Crime News
Mumbai News: शिवरांयांचे आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसवर ठेवल्या प्रकरणी एकाला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.