सोलापूर : उजनीच्या दूषित पाण्यामुळे गुदमरतोय माशांचा जीव

उजनी धरणात पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच कुरकुंभ भागातील औद्योगिक वसाहतीमधील (MIDC) रसायनयुक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जाते.
Dead Fish
Dead FishSakal
Updated on

केत्तूर (सोलापूर) : उजनी धरणात पुणे, पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) तसेच कुरकुंभ भागातील औद्योगिक वसाहतीमधील (MIDC) रसायनयुक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जाते. तसेच या परिसरातील मैला, सांडपाणी थेट उजनीत मिसळत असल्याने पाण्याला हिरवा रंग आला आहे. वाढत्या दूषित पाण्यामुळे (Water Pollution) भीमा नदीचे (Bhima River) रुपांतर गटारगंगेत होते आहे. या दूषित पाण्याचा फटका जलचरांना सध्या बसू लागला असून माशांसाठी टाकलेल्या जाळ्यामध्ये तसेच पिंजऱ्यामध्ये मासे मरू लागले आहेत.

गेल्या काही दिवसात उजनीच्या पाण्याला हिरवा रंग (हिरवा तवंग) आला आहे हे पाणी वाऱ्याने नदीकाठावर आदळले तर त्याला पांढरा फेस येत आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ काय काम करते हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. दरवर्षी होणाऱ्या या प्रदूषणामुळे जलचरांचे अस्तित्व मात्र संकटात आले आहे. या अथांग जलाशयाला मानवनिर्मित प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही, हेच मोठे दुर्दैव आहे. एके काळी स्वच्छ निर्मळ आणि प्रदूषणाच्या विळख्यात पूर्णपणे रुतले आहे.

Dead Fish
पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्ष सक्तमजुरी

उजनीला पर्यटनस्थळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु उजनीत येणारे पाणी दूषित असेल तर त्या पर्यटनस्थळाचे काय होणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पर्यटनस्थळासाठी उजनीतील प्रदूषण रोखण्यापासून सुरवात करणे आवश्‍यक आहे. या प्रदूषणामुळे विविध जातीचे मासे, खेकडे, कासव आदी जलचर प्राणी संकटात आले आहेत .

मानवनिर्मित प्रदूषणामुळे उजनीचे पाणी दूषित होत आहे. पाण्यात उतरल्यावर अंगाची खाज होणे, अंगाला फोड येणे, अंग लाल होणे, असे प्रकार होत आहेत. तसेच पाण्याला मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटली आहे .

-सोमनाथ कनिचे, मच्छिमार, केत्तूर

Dead Fish
कऱ्हाड : ॲक्सल तुटल्यामुळे उसाने भरलेला ट्रक भरचौकात पलटी

वाढत्या प्रदूषणामुळे वाढत्या प्रदूषणामुळे मुबलक प्रमाणात असणाऱ्या माशांच्या जाती वरचेवर नष्ट होत आहेत. आता फक्त घाण पाण्यात राहणाऱ्या चिलापी माशांचे तेवढे अस्तित्व शिल्लक राहिले आहे. मोठ्या प्रमाणावर असलेल्या माशांच्या जाती वरचेवर नष्ट होत आहेत.

- डॉ. अरविंद कुभांर, पर्यावरणप्रेमी

वरचेवर वाढणाऱ्या प्रदूषणामुळे उजनीवरचे पक्षी सौंदर्यही कमी होणार आहे. यासाठी येथील जलप्रदूषण रोखणे आवश्‍यक आहे. उजनीतील पक्षी वैभव व जैवविविधता वाचविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- कल्याणराव साळुंके, पक्षीप्रेमी, करमाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.