सोलापूर : कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणारी वारी व वारकरी परंपरेतील कार्तिकी वारी शासनाने पूर्ववत सुरू करावी. प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाने केली आहे.
या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यंदाची कार्तिक वारी आम्ही करणारच असा निर्धार वारकरी मंडळींनी केलेला आहे. त्याचबरोबर दिंड्या, पालखी सोहळा पूर्ववत करून, पंढरपूर येथील ६५ एकरमध्ये असणाऱ्या सर्व सोयींसुविधा व तेथील उपलब्ध असलेली जागा वारकऱ्यांना देण्यात यावी. चंद्रभागा नदीचे स्नान, पंढरपूर नगर प्रदक्षिणा, वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरा करण्यासाठी अधिकृत परवानगी देऊन सहकार्य करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.
कार्तिक वारीला परवानगी दिली नाही तर अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे, राष्ट्रीय सचिव बळिराम जांभळे, जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चांगभले, जिल्हा सचिव मोहन शेळके, शहराध्यक्ष संजय पवार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.