'विठ्ठल, चंद्रभागा कारखान्याची मालमत्ता जप्त करा; अन्यथा आंदोलन !'

"विठ्ठल, चंद्रभागा कारखान्याची मालमत्ता जप्त करा; अन्यथा आंदोलन !'
"विठ्ठल, चंद्रभागा कारखान्याची मालमत्ता जप्त करा; अन्यथा आंदोलन !'
"विठ्ठल, चंद्रभागा कारखान्याची मालमत्ता जप्त करा; अन्यथा आंदोलन !'Canva
Updated on
Summary

नवीन गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी झाली तरी अद्याप मागील वर्षीच्या हंगामातील थकीत रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही.

पंढरपूर (सोलापूर) : गुरसाळे (ता. पंढरपूर) (Pandharpur) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना (Vitthal Sugar Factory) व भाळवणी (ता. पंढरपूर) येथील चंद्रभागा सहकारी साखर कारखान्यांनी (Chandrabhaga Sugar Factory) मागील हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम अद्याप दिली नाही. राज्य सरकारने या दोन्ही साखर कारखान्यांची साखरेसह उपपदार्थ व इतर मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करावा, त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत रक्कम द्यावी; अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti Sanghatna) प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले (Deepak Bhosale) यांनी दिला आहे. श्री. भोसले यांनी या संदर्भात पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर (Tehsildar Sushil Belhekar) यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले आहे.

"विठ्ठल, चंद्रभागा कारखान्याची मालमत्ता जप्त करा; अन्यथा आंदोलन !'
मोहोळ दुहेरी खून प्रकरण : पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

नवीन गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी झाली तरी अद्याप मागील वर्षीच्या हंगामातील थकीत रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. उसाचे गाळप झाल्यापासून किमान 14 दिवसांमध्ये संबंधित शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक असतानाही विठ्ठल, चंद्रभागा आणि भीमा या तिन्ही साखर कारखान्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. संबंधित कारखान्याच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.

"विठ्ठल, चंद्रभागा कारखान्याची मालमत्ता जप्त करा; अन्यथा आंदोलन !'
श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या काही आठवणी - स्मरण चित्र !

सध्या कारखान्याकडे शिल्लक असलेल्या साखर पोत्यासह उपपदार्थांची विक्री करून शेतकऱ्यांची थकीत रक्कम द्यावी, त्याचबरोबर आजपर्यंत मूळ रकमेवर 15 टक्के व्याज द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत प्रशासनाने संबंधित कारखान्यांकडे उपलब्ध असलेली साखर ताब्यात घेऊन त्याची विक्री करावी, अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही श्री. भोसले यांनी दिला आहे. या वेळी नंदकुमार व्यवहारे, सुनील पाटील, छगन पवार, नेताजी नागणे, तानाजी शिंदे, रामा पुजारी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.