Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या कामातून आजारी शिक्षकांना वगळण्याची मागणी

आजारी असलेल्या व सेवानिवृत्ती जवळ आलेल्या शिक्षकांना तसेच शिक्षिकांना निवडणूक कामातून वगळावे या मागणीसाठी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय संघटनेच्या वतीने करमाळा तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे.
demand for exclusion of sick teachers from Lok Sabha election work solapur
demand for exclusion of sick teachers from Lok Sabha election work solapur Sakal
Updated on

करमाळा : आजारी असलेल्या व सेवानिवृत्ती जवळ आलेल्या शिक्षकांना तसेच शिक्षिकांना निवडणूक कामातून वगळावे या मागणीसाठी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय संघटनेच्या वतीने करमाळा तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या प्रत्येक कामात प्राथमिक शिक्षक अग्रेसर असतात, मात्र ज्या शिक्षकांना कॅन्सर, हृदयरोग, शुगर, किडनीचे आजार, पॅरेलेसिस असे आजार आहेत त्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामातून वगळावे तसेच शिक्षिकांना देखील या कामातून वगळण्यात यावे.

त्यातूनही निवडणुकीसाठी कर्मचारी वर्ग कमी पडल्यास महिला शिक्षकांना ज्या गावात कार्यरत आहेत त्याच गावात किंवा त्याच्या शेजारील गावात निवडणुकीचे काम देण्यात यावे .तसेच ज्या शिक्षकांनी बीएलओ म्हणून काम केले आहे अशा शिक्षकांचे मानधन अद्याप जमा झाले नाही हे मानधन त्वरित जमा करण्यात यावी अशी निवेदन देण्यात आले आहे. शिक्षक नेते हनुमंत सरडे, संतोष पोतदार, चंद्रकांत चोरमले, निशांत खारगे, प्रमोद काळे, शिवाजी खरात, दादासाहेब सोरटे, रामहरी ढेरे, महेश निकत तात्यासाहेब जगताप आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.