गणेश गुंडमींची गो-उत्पादने ! चक्क फेसवॉशपासून बाम व राख्यांची निर्मिती

गणेश गुंडमींची गो-उत्पादने ! चक्क फेसवॉशपासून बाम व राख्यांची निर्मिती
गणेश गुंडमींची गो-उत्पादने ! चक्क फेसवॉशपासून बाम व राख्यांची निर्मिती
गणेश गुंडमींची गो-उत्पादने ! चक्क फेसवॉशपासून बाम व राख्यांची निर्मिती
Updated on
Summary

शेळगी येथील गणेश गुंडमी यांनी फेसवॉश, धूप ते दंतमंजन, पेस्ट, बामसह अगदी चक्क राखीपर्यंत अनेक गो उत्पादनांची (गाईच्या शेणापासून उत्पादने) मालिका धडाक्‍यात सुरू केली.

सोलापूर : शेळगी (Shelgi, Solapur) येथील गणेश गुंडमी (Ganesh Gundmi) यांनी फेसवॉश, धूप ते दंतमंजन, पेस्ट, बामसह अगदी चक्क राखीपर्यंत अनेक गो उत्पादनांची (Products from cow dung) (गाईच्या शेणापासून उत्पादने) मालिका धडाक्‍यात सुरू केली. गायीपासून दूधच नव्हे तर इतर उत्पादनेही फायदेशीर ठरतात, हे या प्रयोगातून त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. पुण्यात पत्रकारिता करताना शेळगीच्या गणेश गुंडमी यांना अचानक एक दिवस कांजीपुरमला (Kanjipiram) गोउत्पादन प्रशिक्षणाची संधी मिळाली. त्यांनी तत्काळ दीड वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करत अनेक उत्पादनांची निर्मिती सुरू केली. गायीचे दूध (Milk) हे उत्पन्नाचे साधन नव्हे तर ते दुय्यम आहे. गाईचे शेण व गोमूत्र यापासून अनेक उत्पादने घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने गोपालनाचे उत्पन्न मिळू शकते, हा दृष्टिकोन समोर ठेवत काम सुरू केले.

गणेश गुंडमींची गो-उत्पादने ! चक्क फेसवॉशपासून बाम व राख्यांची निर्मिती
सोलापूरच्या डॉ. ईशा वैद्य यांची 'मिस इंडिया' स्पर्धेसाठी निवड

गायीच्या शेणापासून लोभान, संबराणी, गुग्गूळ, हवन, चंदन हे धूपाचे प्रकार त्यांनी तयार केले. हवन सामग्रीदेखील तयार केली. दिवाळीसाठी गोमय पणत्या तयार केल्या. या पणत्या जेव्हा जळून जातात, तेव्हा त्या 46 टक्‍क्‍यांपर्यंत ऑक्‍सिजन हवेत सोडून प्रदूषण कमी करण्यास मदत करतात. संबराणी कप याच प्रकारचे काम करतात. रोजच्या जीवनात ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व वस्तूंची निर्मिती गो उत्पादनाच्या आधारे करण्यासाठी त्यांचा अभ्यास कायम सुरू होता. त्यांनी शेणाच्या राखेपासून दंतमंजन तयार करत त्यामध्ये इतर दंतवर्धक पदार्थांचा समावेश करून या मंजनाची निर्मिती केली. गोमूत्र व शेणापासून त्यांनी साबण तयार केला. वांग व इतर त्वचा आजारांवर उपयुक्त असा फेसवॉश पॅक तयार केला. घोरणे, श्‍वसनाच्या आजाराची विशेष औषध तयार केली. आयुर्वेद अभ्यासानुसार जुने तूप दोन वर्षे ठेवून त्याची सूर्यकिरणासोबत प्रक्रिया करत हे विशेष तूप विक्रीसाठी उपलब्ध केले. दिवाळीसाठी उटणे तयार केले. दिवाळीला इतरांना भेट देण्यासाठी या उत्पादनांचे गिफ्ट पॅक तयार केले. औषधामध्ये डोकेदुखीसाठी लागणारे काही बाम पेट्रोलियम जेलीपासून तयार करून ते महाग दराने विकतात. तेव्हा गुंडमी यांनी तुपापासून बाम तयार केला आहे. उत्पादने घेत असताना गोपालक शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी त्यांनी गाईच्या शेणाचे पावडर 20 रुपये किलोने विकत घेण्याचे पुढील वर्षासाठी नियोजन केले आहे. गोपालक शेतकऱ्यांकडून कच्चा माल खरेदीची प्रक्रिया शहरातच सुरू होणार आहे.

गणेश गुंडमींची गो-उत्पादने ! चक्क फेसवॉशपासून बाम व राख्यांची निर्मिती
कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली तरुणाची दीड लाखाची फसवणूक !

चक्क शेणापासून राखी

यावर्षी गुंडमी यांनी चक्क शेणापासून राखी तयार केली आहे. प्लॅस्टिकपासून तयार होणाऱ्या राखीला पर्याय म्हणून त्यांनी शेणापासून सुंदर राख्या बनविल्या आहेत. पर्यावरणपूरकतेचा संदेश देण्यासाठी ही निर्मिती केली. या राखीच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

गाईचे दूध हे उत्पन्नाचे साधन नव्हे तर इतर उत्पादनांतून खरे उत्पन्न मिळू शकते. त्या दृष्टीने या प्रकारची पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्तीला मदत करणारी उत्पादने बाजारात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

- गणेश गुंडमी, गो उत्पादक, शेळगी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.