सोलापूर - जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा ३८ टक्के जास्त पाऊस होऊन देखील जिल्ह्यातील ५६ पैकी २८ लघू प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. बार्शी तालुका वगळता बहुतांश लघू प्रकल्प कोरडे आहेत. कोरडे प्रकल्प जास्त असलेल्या तालुक्यांमध्ये अक्कलकोट, सांगोला व मंगळवेढ्याचा समावेश आहे. करमाळा तालुक्यात देखील काही प्रकल्प कोरडे आहेत. सातत्याने कोरड्या राहणाऱ्या तलावांत उजनी धरणातून पावसाळ्यात पाणी सोडण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे.