तिन्ही कर्जमाफीत काही ठरावीक शेतकरी थकलेलेच होते, ही बाब बॅंकांच्या निदर्शनास आली.
सोलापूर : राज्यातील अडचणीतील बळिराजाला आधार देण्याच्या हेतूने सरकारने 2001, 2008 आणि 2017 मध्ये कर्जमाफी (Debt forgiveness) दिली. मात्र, तिन्ही कर्जमाफीत काही ठरावीक शेतकरी थकलेलेच होते, ही बाब बॅंकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे कर्ज घेतल्यानंतर पुन्हा कर्जमाफी होईल, या आशेने बॅंकेकडे न फिरकणाऱ्यांना कर्जवाटप बॅंकांनी यंदा केलेले नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने तिन्ही कर्जमाफीचा लाभ घेतला होता. बॅंक रेकॉर्ड खराब असतानाही त्याने बॅंक कर्ज देत नसल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे (District Deputy Registrar's Office) केली होती. परंतु, बॅंकेच्या अधिकाऱ्याने त्याचे रेकॉर्ड काढल्यानंतर उपनिबंधकांनी तो तक्रारी अर्ज निकाली काढला आहे. (Despite being a three-time loan waiver beneficiary, the farmer complained that he was not getting the loan-ssd73)
जिल्ह्यातील सहकारी, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांनी सव्वालाख शेतकऱ्यांना एक हजार 426 कोटींचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने दिले. परंतु, खरीप हंगाम संपत आला तरीही, जिल्ह्यातील 58 हजार 285 शेतकऱ्यांना अजूनही कर्ज मिळालेले नाही. बॅंकांनी कर्जवाटपाचा हात आखडता घेत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जवाटप केलेले नाही. उद्दिष्टातील केवळ 802 कोटींचेच कर्जवाटप केले असून आणखी 626 कोटींचे कर्जवाटप करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील एक लाख 25 हजार 163 शेतकऱ्यांना बॅंकांनी उद्दिष्टानुसार खरीप हंगामात कर्जवाटप करावे, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी वारंवार दिले. तरीही, काही बॅंकांनी कर्जवाटपात हात आखडताच ठेवला आहे. दरम्यान, राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने (State Level Bankers Committee) यंदा खरिपासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला (District Central Bank) 152 कोटी 40 लाखांचे, विदर्भ कोकण बॅंकेला (Vidarbha Konkan Bank) 49 कोटी 33 लाखांचे आणि राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांना (Nationalized and commercial banks) एक हजार 224 कोटी 26 लाखांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले. त्यापैकी जिल्हा बॅंकेने सर्वाधिक 221 कोटी 76 लाखांचे कर्जवाटप केले आहे. यंदा जिल्हा बॅंकेने उद्दिष्टापेक्षाही जास्त कर्जवाटप केले आहे. दुसरीकडे विदर्भ कोकण बॅंकेने 28 कोटी 43 लाखांचे तर राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांनी 552 कोटी एक लाखांचेच कर्जवाटप केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 58 हजार 285 शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले असून आणखी 58 हजारांहून अधिक शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेतच असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली.
तिन्हीवेळा लाभार्थी, तरीही कर्जासाठी तक्रार
मागील 21 वर्षांत राज्यातील बळिराजाला तीनवेळा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. 2001, 2008 आणि 2017 मध्ये कर्जमाफी झाली. त्यानंतर आता महाविकास आघाडीनेही कर्जमाफीची घोषणा केली असून त्यातील दोन लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांना अजून लाभ मिळालेला नाही. दरम्यान, मागील तिन्ही कर्जमाफीचा लाभार्थी ठरलेल्या एका शेतकऱ्याने जिल्हा उपनिबंधकांकडे कर्ज मिळत नसल्याची तक्रार केली. तक्रारी अर्ज दिल्यानंतर त्या शेतकऱ्याने उपनिबंधकांकडे वारंवार पाठपुरावा केल्याची माहिती उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने "सकाळ'शी बोलताना दिली. प्राप्त तक्रारीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्याबद्दल संबंधित बॅंकेच्या अधिकाऱ्याला विचारणा करण्यात आली. त्या वेळी अधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्याचे बॅंक डिटेल्स बैठकीत ठेवले. एकदा कर्ज घेतल्यानंतर कर्जमाफी होईपर्यंत तो बॅंकेत फिरकलाच नाही, असे त्या वेळी दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.