पक्षनेतेपदाचा वाद ! भाजप प्रदेशाध्यक्षांच्या पत्राला बगल 

_chandrakant_patil.
_chandrakant_patil.
Updated on

सोलापूर : जिल्हा परिषदेतील भाजपच्या वाट्याचे पक्षनेतेपद पाच वर्षे स्वत:कडेच राहावे, यासाठी आनंद तानवडे यांनी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे उबंरठे झिजवले. दरम्यान, त्यांना नुतन झेडपी अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांनीही पक्षनेतेपदाचे पत्र दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनीही अण्णाराव बाराचारे हेच नवे पक्षनेते असल्याचे स्पष्ट केले. मात्र, तानवडे यांनी झेडपी अध्यक्षांचे पत्र खिशात ठेवत अद्याप खुर्ची सोडलेली नाही. 


अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आमदार संजय शिंदे यांच्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील गटातील अनिरुध्द कांबळे यांच्या हाती झेडपी अध्यक्षपदाची सूत्रे गेली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र, जिल्हा परिषदेतील राजकारणाची बदललेली समिकरणे ओळखून विरोधीपक्षनेते ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांच्याकडेच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज्यातील फडणवीस सरकार पायउतार झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील पक्षनेतेपद तानवडे यांच्याकडेच ठेवायचे की नव्याला संधी द्यायची, हा वाद सुरु झाला. तत्पूर्वी, तानवडेंनी आमदार विजयकुमार देशमुखांकडे पक्षनेतेपदाच्या मागणीचा सपाटाच लावला. त्यावर देशमुखांनी स्पष्ट भाष्य टाळले, परंतु त्यांचे गप्प बसणे म्हणजे आपल्यासाठी होकार असल्याचे समजून तानवडेंनी खुर्ची सोडलीच नाही. दरम्यान, हा वाद भाजपच्या प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहचला. त्यांनी बाराचारे हे नवे पक्षनेते असतील, असे स्पष्ट केले. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्षांचे पत्र आणि माजी पालकमंत्र्यांचा सपोर्ट, याचा अधार घेत तानवडे यांनी त्याच कार्यालयात बसायला सुरवात केली आहे. दरम्यान, दोन्ही देशमुख गटातील वादामुळे आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रदेशाध्यक्षांकडे पक्षनेतेपदाची मागणी केली. त्यानुसार पुढील वर्षी राऊत गटाच्या मदन दराडेंना संधी मिळण्याची शक्‍यता असून त्यांनी सोशल मिडियातून कार्यकर्त्यांना तसा मेसेजही दिला आहे. मात्र, सलग पाच वर्षे आपणच पक्षनेते राहणार, असा विश्‍वास तानवडेंनी व्यक्‍त केल्याच्या चर्चेने हा वाद आणखी चिघळल्याचे चित्र आहे. 


सोशल मिडियातील दराडेंचा मेसेज 
आमदार राजाभाऊ राऊत प्रेमी कार्यकर्त्यांना विनंती आहे की, माझी जिल्हा परिषदेच्या पक्षनेतेपदी निवड झालेली नाही. आपल्याला पुढील वर्षी 2021 मध्ये पक्षनेतेपद मिळणार आहे. तरी सोशल मिडियावर अभिनंदनीय पोस्ट टाकू नये, ही विनंती. तरीही मला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.