डॉक्‍टर म्हणाले, आजी दोन दिवसांपेक्षा जास्त जगू शकणार नाही ! पण आजीने...

मधुमेह व ब्लडप्रेशरचा त्रास असतानाही मंगळवेढा येथील महिला कोरोनामुक्त झाली
Corona
CoronaCanva
Updated on
Summary

आजीने "मी घरी बरी होते, मला घरी घेऊन चला' असा आग्रह कुटुंबीयांसमोर धरला. त्यामुळे एका बाजूला समोर आजी जगेल की नाही, अशी भीती असताना घरी न्यावे की नको, असा प्रश्न कुटुंबीयांसमोर उभा राहिला.

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील बावची येथील 60 वर्षीय आजीचा मधुमेह (Diabetes) आणि रक्तदाबाचा (and hypertensio) त्रास होता. अशातच त्यांचा कोरोना (Covid-19) टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मंगळवेढ्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र तेथील वातावरण पाहून आजीने घरी जाण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान ऑक्‍सिजनची (Oxygen) पातळी घसरली. मात्र तरी आजीने आपल्या कुटुंबीयांकडे घरी नेण्याचा आग्रह धरला. त्या वेळी डॉक्‍टरांनी, तुम्ही जर घरी नेणार असाल तर आजी दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस जगणार नाही, असा इशारा दिला. मात्र आजीने घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला व यादरम्यान ऑक्‍सिजनची पातळी वाढवून आजारातून मुक्त होत आपली दुर्दम्य इच्छाशक्तीची कमालच दाखवली. यामुळे कुटुंबीयांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले. (Despite suffering from diabetes and high blood pressure, the woman from Mangalwedha was released from the corona)

Corona
आग्या मोहोळ स्थलांतराचा अफलातून प्रयोग ! हजारो मधमाशांचे वाचले प्राण

तालुक्‍यातील बावची येथील विजया गायकवाड या साठवर्षीय आजी मधुमेह आणि रक्तदाबाच्या त्रासात असताना तिला कोरोनाचा संसर्ग झाला. आरटी-पीसीआर (rt-pcr) स्कोअर 13 होता. ऑक्‍सिजनची पातळी घसरल्यामुळे तिला उपचारासाठी मंगळवेढ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरानावर उपचार सुरू असतानाच त्यापूर्वीच्या मधुमेह आणि रक्तदाबाच्या त्रासाला मोठ्या धैर्याने सामोरे गेल्या. मात्र तिच्या शेजारी असलेल्या इतर रुग्णांचे हाल व सभोवतालची परिस्थिती पाहिल्यावर आजीने "मी घरी बरी होते, मला घरी घेऊन चला' असा आग्रह कुटुंबीयांसमोर धरला. त्यामुळे एका बाजूला समोर आजी जगेल की नाही, अशी भीती असताना घरी न्यावे की नको, असा प्रश्न कुटुंबीयांसमोर उभा राहिला. डॉक्‍टरांनी रुग्णाला घरी नेल्यास एक- दोन दिवसात काही बरे-वाईट झाल्यास आम्हाला जबाबदार धरू नये, असा इशारा दिला. त्यात ऑक्‍सिजनची पातळी घसरल्यामुळे आजीबद्दल दोन दिवसांची हमी देण्यात आली.

Corona
चिलटं डोळ्यांभोवती का घोंघावतात? चिलटांपासून अशी घ्या खबरदारी

रुग्णवाहिकेतून गावात नेल्यास इतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू नये यासाठी त्यांनी खासगी वाहनातून आजीला 5 मे रोजी घरी नेले. घरीच आयुर्वेदिक व घरातले उपचार तसेच पूर्वी असलेल्या मधुमेह, रक्तदाबाच्या गोळ्या सुरू ठेवल्या. पाहता- पाहता आजी ऑक्‍सिजन पातळीत वाढ करण्यात यशस्वी झाल्या व त्यांची ऑक्‍सिजनची पातळी 95 पेक्षा अधिक झाली. त्यामुळे 5 मे रोजी दोन दिवसांत आजी जगेल की नाही, याची शाश्‍वती नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले, मात्र आजतागायत आजी सुखरूप आणि ठणठणीत आहे. त्यामुळे आरटी-पीसीआर स्कोअर 20 पेक्षा अधिक असलेले रुग्ण घरी आले मात्र सात स्कोअर असलेले भीतीमुळे व ग्रामीण भागातील चुकीच्या वैद्यकीय उपचारामुळे जीवाला मुकले. मात्र अशा संकटामध्ये बावचीच्या आजीने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्वीच्या आजारांशी सामना करत कोरोनालाही चित करण्यात यशस्वी ठरल्या.

कोरोना संकटात आईने रुग्णालयातून घरी नेण्याचा आग्रह धरल्यामुळे द्विधा परिस्थिती निर्माण झाली होती. सद्य:परिस्थितीत दोन दिवसांनंतर आई हाती लागणार नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितल्यामुळे काळजीने कुटुंबीय त्रस्त झालो होतो. पण घरातील उपचाराच्या जोरावर या रोगावर आईने मात केली, याचे आम्हाला समाधान वाटते.

- दीपक गायकवाड, बावची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.