माजी आमदार कै. गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज मंगळवारी (ता. 17) रोजी देवेंद्र फडणवीस त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
सांगोला (सोलापूर) : आबासाहेबांसारखी माणसे ही पक्षविरहीत आहेत. आबासाहेबांचे विधानमंडळातील भाषणे ऐकून आमच्यासारख्या अनेकांना महाराष्ट्राचे प्रश्न समजले आहेत. आबासाहेबांची उंची व कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांनी विधानमंडळाच्या संस्थेची उंची वाढवली आहे. अशा महान, तत्त्वनिष्ठ व्यक्तीचे विधिमंडळाच्या आवारात स्मारकरूपी पुतळा उभा करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.
शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कै. गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज मंगळवारी (ता. 17) रोजी देवेंद्र फडणवीस त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीवेळी कै. गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव पोपटराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, आबासाहेबांचे नातू बाबासाहेब देशमुख यांच्यासह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, धैर्यशील मोहिते-पाटील, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, शशिकांत चव्हाण, माजी आमदार लक्ष्मण ढोबळे, आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, नानासो लिगाडे, अभिजित नलवडे, दत्ता टापरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुष्काळी भागातील लोकांचे दुःख जाणारा नेता, सामान्यांसाठी सतत लढत असलेले व प्रश्न सोडणारे नेते म्हणूनच त्यांची ओळख होती. त्यांनी सर्वसामान्यांसाठी केलेले कार्य महान आहे. गणपतरावांच्या कार्याची खूप मोठी परंपरा आहे. त्यांच्या कार्यात त्यांच्या कुटुंबीयांनीही साथ दिली आहे. अशा तत्त्वनिष्ठ व्यक्तीचे विधानभवनाच्या आवारात स्मारकरूपी पुतळा उभा केला पाहिजे. याचा अधिकार जरी अध्यक्ष व सभापती यांना असला तरी त्यांना भेटून स्मारक उभारणीची विनंती मी करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
...तर आबांना मतदान करण्यास मला आनंद झाला असता
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, या वेळी मी राजकारणावर बोलणार नसल्याचे सांगितले. परंतु आबासाहेबांसारख्या पक्षविरहीत असलेल्या नेत्याला मला मतदान करताना आनंद झाला असता, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.