मंदिरे बंद ठेवण्यावरून फडणवीसांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा! म्हणाले...

मंदिरे बंद ठेवण्यावरून फडणवीसांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा ! म्हणाले...
मंदिरे बंद ठेवण्यावरून फडणवीसांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा ! म्हणाले...
मंदिरे बंद ठेवण्यावरून फडणवीसांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा ! म्हणाले...Canva
Updated on
Summary

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त श्री. फडणवीस आज पंढरपूरमध्ये आले होते.

पंढरपूर (सोलापूर) : जेवढी गर्दी बार आणि मॉलमध्ये होते, त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात (Temples) होते. सोशल डिस्टन्स (Social Distance) ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे? आम्हाला जेथे आहे तेथे देव आहे; मात्र अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. हारफुले विक्रेत्यापासून ते मंदिरातील पुजाऱ्यापर्यंत अशा अनेक गरीब व गरजू लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरे उघडा. मंदिरे बंद ठेवणे सरकारची चूक आहे. तुम्ही दारूची दुकाने उघडी ठेवता मात्र मंदिरे बंद का ठेवता, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray government) टोला लगावला. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक (Sudhakarpant Paricharak) यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त श्री. फडणवीस पंढरपूरमध्ये (Pandharpur) आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यातील मंदिरे उघडण्याची त्यांनी मागणी केली.

मंदिरे बंद ठेवण्यावरून फडणवीसांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा ! म्हणाले...
आबासाहेबांनी विधानमंडळाच्या संस्थेची उंची वाढवली : देवेंद्र फडणवीस

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या दीड - दोन वर्षांपासून राज्यामध्ये लॉकडाउनसदृश परिस्थिती आहे. त्यातच मंदिरे देखील बंद आहेत. आता काही प्रमाणात लॉकडाउन शिथील करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे सरकारने खुली करावीत. मॉल, दारूची दुकाने उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी गर्दी होत आहे. परंतु धार्मिक स्थळे व मंदिरे अजूनही बंद ठेवली आहेत. या ठिकाणी लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतात. परंतु कमी गर्दीच्या ठिकाणी सरकार परवानगी देत नाही. सरकारने आता डोळे उघडून राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत, अशी मागणी श्री. फडणवीस यांनी केली.

मंदिरे बंद ठेवण्यावरून फडणवीसांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा ! म्हणाले...
डी-मार्टमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल ! चार मिनिटांत पोलिस घटनास्थळी

या वेळी आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक, बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, पांडुरंग साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकर मोरे, बाजार समितीचे माजी उपसभापती संतोष घोडके, संचालक भगवान चौगुले, सुरेश आगवणे, तानाजी वाघमोडे, वसंत देशमुख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.