Dhanagar Reservation : आरक्षणाच्या मुद्यावर धनगर समाज आक्रमक,मोहोळमध्ये रास्ता रोको आंदोलन

Dhanagar Community : धनगर समाजाने अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सोमवारी (ता. २३) मोहोळमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूरमध्ये बारा दिवसांपासून उपोषण सुरू असून, शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
Dhanagar Reservation
Dhanagar Reservationsakal
Updated on

मोहोळ : मोहोळ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासननिर्णय काढण्याच्या अनुषंगाने सोमवारी (ता. २३) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार व पोलिस निरीक्षकांच्या नावे देण्यात आले.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वितरित मिळावे. याकरिता पंढरपूर या ठिकाणी बारा दिवसांपासून आमरण उपोषण व आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आंदोलन होणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांच्याबरोबरच पोलिस निरीक्षक मोहोळ यांना तालुक्यातील धनगर बांधवांच्या वतीने देण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने लवकरात लवकर कार्यवाही करून याबाबत शासन निर्णय जारी करावा. धनगर जमातीच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने आवश्यक निर्णय घेऊन न्याय देण्यात यावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोहोळ येथील मार्केट यार्ड गेट क्र. ९ समोरील महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी अतुल गावडे, सुशील क्षीरसागर, गणेश गावडे, मंगेश पांढरे, लक्ष्मण करे, अनंता नागणकेरी, बाळासाहेब वाघमोडे, दीपक पुजारी, बाबूराव दाईगडे, प्रताप आलदर, चंद्रकांत बरकडे, खंडू हाक्के, दिनकर लेंगरे, सूरज बरकडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.