Solapur News : मंगळवेढा पोलीस ठाण्यात धनगर बांधवाचा ठिय्या

सहायक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांनी सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले
Solapur News
Solapur Newsesakal
Updated on

मंगळवेढा : तालुक्यातील शिरसी येथे गेल्या दहा दिवसापुर्वी तहसीलदारांनी दिलेल्या रस्त्यावर ट्रॅक्टरने नांगर घालून मोडत असताना विचारायला गेलेल्या धनगर समाजातील दोघांवर बठाण येथील गुन्डंप्रवृतीच्या दहा जणांनी व शिरसी येथील चार जणांनी प्राणघातक हल्ल्या केल्या प्रकरणी धनगर समाज बांधवांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.

Solapur News
शाळाबाह्य,स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोधमोहीम

यावेळी माऊली हळणवर,अॅड रविकिरण कोळेकर, तानाजी कांबळे, पिंटू शिंदे, दामाजी मेटकरी सिद्धेश्वर कोकरे , .राहुल ढेकळे सत्यवान शिंदे, सुरेश शिंदे ,बापू शिंदे अविनाश पाटील, सोमा होनमाने, नितीन मेटकरी, महादेव विरकर,राहुल ढेकळे याचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या हल्ल्यात संतोष कुलाळ,व समाधान कुलाळ हे गंभीर जखमी झाले असून यातील एकावर मिरज येथे उपचार सुरु आहेत त्याची प्रकृती चिंताजनक असून दुसर्‍या जखमी सह इतर चौघांना पोलीसानी राजकीय दबावात आरोपीची आंगठी चोरली म्हणून अटक केली याचा जाब विचारण्यासाठी धनगर समाजाचे नेते माऊली भाऊ हळणवर याचे व प्रा.सुभाष मस्के यांच्या नेतृत्वाखाली व मंगळवेढ्याचे युवा नेते रविकिरण कोळेकर यांच्यासह समाज बांधवानी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले व इतर राजकीय,दबावातून धनगर समाजावर अन्याय करणाऱ्या आरोपींना मोकाट सोडून अन्यायग्रस्तांनाच खोट्या केसमध्ये गुंतवले असल्याचा आरोप करत सुमारे तासभर ठिय्या मारला.

सहायक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांनी सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले परंतु यावर आंदोलकांनी विश्वास न ठेवता आंदोलन सुरू ठेवले यावेळी आंदोलकांनी सदर गावगुंड आरोपींना तात्काळ अटक करा व सदर आरोपी वर 307 ने गुन्हा दाखल करा या प्रकरणात तपास अधिकारी निंबाळकर यांच्याकडून तपास काढून घेऊन वरिष्ठांकडे तपास देऊन विशेष तपास करावा अन्यथा येत्या चार-पाच दिवसांमध्ये मंगळवेढा पोलीस ठाण्यावर धनगर व इतर सर्व बहुजन बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्याचे इशारा माऊली भाऊ हळणवर यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.