मोहोळ - धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, या मागणीसाठी मोहोळ तालुका धनगर समाजाच्या वतीने मंगळवारी (ता. ३) जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चातील हजारो समाजबांधवांच्या गळ्यातील पिवळे टॉवेल व डोक्यावर ‘मी धनगर’ लिहिलेली पिवळी टोपी, पारंपरिक धनगरी ढोल व झांज पथके यामुळे मोहोळमध्ये अक्षरश: पिवळे वादळ अवतरल्याचे चित्र होते.
यावेळी अनेक धनगर समाजबांधवांनी आरक्षणाबाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. समाजाच्या वतीने तहसीलदारांना आरक्षणाच्या मुख्य मागणीसह अन्य महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी यावेळी माजी आमदार रामहरी रूपनर बोलत होते. सोलापूर शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष चेतन नरोटे, कल्याणी वाघमोडे, शेखर बंगाळे, प्रा. शिवाजी बंडगर, बिरुदेव देवकते, कृष्णदेव वाघमोडे, बाळासाहेब वाघमोडे, रामचंद्र खांडेकर
शिवाजी पुजारी, धनाजी गावडे, यशवंत नरुटे, नागनाथ क्षीरसागर, माऊली हळणवर, तात्या पाटील, समाधान पाटील, बाळासाहेब राजेपांढरे, विलास ढेरे, फंटू गोफणे, अनंता नागणकेरी, मंगेश पांढरे, लक्ष्मण करे, सुभाष मस्के, नामदेव नरुटे, शाहीर सलगर, संजय क्षीरसागर, नितीन टेळे, नीलेश जरग, राजाभाऊ सलगर, सुशील क्षीरसागर, ओंकार देशमुख, सोनबा पाटील, अतुल गावडे यांच्यासह हजारो समाजबांधव उपस्थित होते.
तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन
भारतीय संविधानामध्ये भटके जीवन जगणाऱ्या धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश केला आहे. परंतु ‘धनगड’ व ‘धनगर’ असा शब्दच्छल करीत आजतागायत धनगर समाजाला एसटीच्या सवलतीपासून सर्वच सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक वंचित ठेवले आहे. मागील ७० वर्षे समाजाच्या या मागणीची दखल सत्तेतले कोणीही घेतली नाही.
खोटी आश्वासने देत उलट ज्या सवलती होत्या त्या बंद केल्या. त्यामुळे धनगर समाजाने आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एल्गार पुकारला आहे. शासनाने ५० दिवसांची मुदत मागितली आहे. या काळात धनगर समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी आमदार रामहरी रूपनर यांनी दिला.
जनआक्रोश मोर्चातील ठळक बाबी
संपूर्ण तालुक्यातून पहिल्यांदाच राजकीय मतभेद विसरून हजारोच्या संख्येने समाजबांधव एकत्र.
जनआक्रोश मोर्चात एक हजार मेंढरे घेऊन मेंढपाळांचा सहभाग
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरवात
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीस सकल मराठा समाज, ज्योती क्रांती परिषद, शिवसेना ठाकरे गट यांचे जाहीर पाठिंब्याचे पत्र.
महामार्गावर सातत्याने होणारी वाहनांची कोंडी, यामध्ये हजारो धनगर समाजबांधव व हजारो मेंढरे अशा परिस्थितीत पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी अतिशय संयमी व तत्परतेने परिस्थिती नियंत्रित ठेवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.