बार्शी (सोलापूर) - गणेश उत्सवानिमित्त पोलिस पथक गस्त घालत असताना पथकाने एकेरी वहातुकीचा नियम मोडून जात असताना टँकरला (Tanker) पोलिसांनी (Police) पकडताच तो टँकर बेकायदेशीरपणे डिझेल, विनापरवाना वहातूक करीत काळ्या बाजारात घेऊन जात असल्याचे स्पष्ट होताच चालक व वाहकाविरोधात बार्शी शहर पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल करून 18 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
चालक प्रदिप समर बहादूर यादव (वय 28, रा. पेल्हार रोड, नालासोपारा, जि .पालघर), वाहक पवन तिवारी (रा. धानुबाग, गावदेवी मंदीर, श्रीहरी कमला नगर चाळ, नालासोपारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस लक्ष्मण भांगे यांनी फिर्याद दाखल केली ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली.
मुंबई येथून मनोहर मेहर पेट्रोकेमिकल येथून 9 हजार लिटर डिझेल टँकरच्या तीन कप्प्यांमध्ये भरुन टँकर क्रमांक MH O4 KF 1831 हा लातूर येथे जात असताना एकेरी वाहतूक सुरू होती त्यावेळी चालकाने नोएन्ट्री असलेल्या रस्त्याने गेल्याने त्यास पोलिस पथकाने पकडले .
कागदपत्रे , परवाना सर्व माहिती पोलिसांनी घेतली असता डिझेल काळ्या बाजारात जात असल्याचे स्पष्ट होताच तहसीलदार , पुरवठा अधिकारी प्रताप कोरके यांनी घनता तपासून दोन पंचासमक्ष पंचनामा केला. टँकरसह 8 लाख 55 हजारांचे डिझेल पोलिसांनी जप्त केले आहे .
हे डिझेल विठ्ठल पिठारे (रा. वाकड पूणे) यांनी भरुन दिले असून मनोज होनमाने (रा. माळीनगर) सीताराम भरणे (रा. माहित नाही) यांचेसाठी भरले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.