बॅक व्यवहारातून गैरव्यवहार थांबवून भारत महासत्ता होण्यासाठी बॅकीग क्षेत्रात डिजिटल ई- रुपी हे गेम चेंजर राहील, असे प्रतिपादन चार्टर्ड अकाउंटट संजीव कोठाडिया यांनी व्यक्त केले.
मंगळवेढा - बॅक व्यवहारातून गैरव्यवहार थांबवून भारत महासत्ता होण्यासाठी बॅकीग क्षेत्रात डिजिटल ई- रुपी हे गेम चेंजर राहील, असे प्रतिपादन चार्टर्ड अकाउंटट संजीव कोठाडिया यांनी व्यक्त केले. येथील रतनचंद शहा बँकच्या वतीने ही ई-रुपी जनजागृती अभियानांतर्गत शहरातील व्यापाऱ्यांसाठी त्यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, उपाध्यक्ष रामचंद्र जगताप, संचालक मुजफ्फर काझी, बजरंग ताड, अॅड रमेश जोशी, संतोष बुरकुल, दत्तात्रय दत्तू ,उद्योजक शरद हेंबाडे, नागेश राऊत, प्रतिक किल्लेदार हरिकिशन बजाज, पप्पू दायमा विशेष कार्य अधिकारी अरविंद नाझरकर, दयासागर देशमाने दत्तात्रय शिर्के, आदीसह व्यापारी, पतसंस्थेचे अधिकारी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना चार्टर्ड अकाउंटंट कोठाडिया म्हणाले की, अलिकडच्या काळात रिझर्व बँकेने युरोपीय चालनास सुरुवात केली असून, देशातील चार शहरात सध्या सुरू आहे. लवकरच इतर ठिकाणी सुरू होईल. लॉकडाऊन मध्ये डिजिटल ट्रांजेक्शनवर अनेक लोकांनी व्यवहार केल्यामुळे डिजिटल ट्रांजेक्शन बद्दल बहुतेक लोकांना ज्ञान झाले आहे.
देशातील 140 कोटी लोकसंख्येत 80 कोटी मोबाईल धारक असल्याचे सर्वेक्षणात समोर आले. डिजिटल करन्सीवर व्यापारी भर देऊ शकतात. त्यामुळे अनेक गैरव्यवहारावर आळा बसेल. या जनजागृती अभियानात डिजिटल रूपेचे फायदे तोटे, सर्वसामान्य लोकांना डिजिटल रूपी वापरता येईल का? ग्रामीण भागात इंटरनेट नसताना मोबाईल वरून व्यवहार करता येईल का? आपल्या बँक खात्यातील सेविंग व चालू खात्यातील रकमेचे करायचे काय? मोबाईल वरून व्यवहार कसे होणार? डिजिटल रूपी व्यवहारात कोणती दक्षता घ्यावयाची, प्रत्यक्ष नोटा या पुढील व्यवहारात बंद होणार का? प्रत्यक्ष व्यवहार बंद होणार का?
डिजिटल ई -रुपी व्यवहारात यूपीआय, गुगल पे, फोन पे बंद होणार का? या सह अनेक विषयावर चार्टर्ड अकाउंटंट कोठाडिया यांनी सविस्तर विश्लेषण करून उपस्थित आमचे डिजिटल रुपी बद्दल जनजागृती केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.