आरं लगा... त्यो आपला तात्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाला नाय म्हंतूया... पंढरपुरातील दोन कार्यकर्ते चर्चा करत हुते...
आरं लगा... त्यो आपला तात्या कॉंग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाला नाय म्हंतूया... पंढरपुरातील (Pandharpur दोन कार्यकर्ते चर्चा करत हुते... गेली 25 वरसं तात्याकडं पंढरीचं तालुकाध्यक्षपद हुतं... आता मातुर तात्या कंटाळलं हाय... त्येंनी सोताचं नकु म्हनूनशान सांगितल्याचं पेपरात आल्तं... तात्यांची पावशतकी वाटचाल पाह्यल्यावर कोणालाबी न दुखवणारा कार्यकर्ता असंच म्हनत्यात त्येस्नी... पण पंढरीत कॉंग्रेस काय वाढली नसल्याची तक्रारबी हुतीया... गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत सायबास्नी हिथं काय फार फायदा झाला नसल्याचं सांगत्यात... तात्या तर काय करणार राव... पंढरीत बड्यांचीच चलती राह्यतीया! (Discussions have started about the career of the Congress leader in Pandharpur)
राज्यात महाइकास आगाडीची (Mahavikas Aghadi Government) सत्ता अस्ताना, त्येच्यात पुन्हा सत्तेत कॉंग्रेस पक्ष असतानाबी तात्या नको म्हनत्यात म्हंजी काय तर नक्कीच असल्याचं कार्यकर्ते बोलू लागल्याती... तसं तात्या पूर्वीचं पंताचं कार्यकर्ते... पंत राष्ट्रवादीत (NCP) गेल्यानंतरबी तात्या कॉंग्रेसशी इमान राखत पक्षातच राह्यलं... कॉंग्रेसचा झेंडा खांद्यावर घेत तात्यांनी आजपतूर सर्वसामान्यांची कामं केली... पतसंस्थेचं नाव जरी पंतांचं असलं तरी तात्यांनी आपली कॉंग्रेस निष्ठा सोडली नाय... राज्यात सत्तांतर झालं... अनेक घडामोडी घडल्या... पंढरपूर तालुक्यात लई मोठ्ठी राजकीय उलथापालथ झाली. तरीबी तात्या आपल्या मतावर ठाम राह्यलं... आता मातुर तात्या लईच वैतागलं... वयबी झालंय म्हनत्यात... पण खरं कारण मात्र तात्यानं गुलदस्त्यात ठेवल्याचंबी कार्यकर्ते बोलू लागल्याती... दस्तुरखुद्द सायबबी कॉंग्रेसमधी आपल्याला किमत राह्यली नसल्याचं इंदापुरात (Indapur) बोल्ले हुते... एवढ्या मोठ्या माणसाचं काय खरं नाय... मग आपलं कसं? असा इचार करून तवापास्नं तात्यांनी डोस्क्यात थांबायचंच ठरवलं हाय हे मातुर खरं हाय!
जुन्या पिढीची ती कॉंग्रेसबी आता राह्यली नसल्याची चर्चा नेहमीच हुतीया... पण सत्तेवर असताना पक्षाचं अध्यक्षपद सोडायचं म्हंजी खरंच कमाल म्हणा की? पूर्वीच्या काळात कॉंग्रेसचा साधा कार्यकर्ता म्हनूनशानबी काम करतानाची शानच लई येगळी हुती... आता मातुर कॉंग्रेस अन् शिवसेनेचंबी (Shiv Sena) तसंच झालंया... राज्यात सत्तेत भागीदार राहूनबी काम काय हुत नायती... सन्मानबी मिळत नाय... सोलापूरच्या पालकमंत्री मामाइरुद्ध शिवसैनिक नेहमीच ओरडत्यात... त्यात नवीन असं काय राह्यलं नाय... केवळ मुख्यमंत्रीपदावर उद्धवसायब (Uddhav Thackeray)बसल्याती... पण कारभार मातुर त्यांच्याकडनं काय हुत नाय... केवळ सहीचे अधिकारी ते राह्यल्याचं ओरड हाय... शिवसैनिक असो की कॉंग्रेसचा पदाधिकारी दोन्हीबी पक्षात नेहमीच असे प्रकार पहायला मिळत्यात...
कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षदावर धवलदादा आल्यापास्न त्येंनी जिल्हाभर दौरे केले... नव्या सवंगड्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरु केला... मोहिते-पाटील नावालाच वलय असल्यानं जिल्ह्यामधी कायतर क्रांती हुईल असं वाटू लागलंय... ते आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसून येईल. सध्या कॉंग्रेसमधी पंढरीतलं दादाचं जवळचं कार्यकर्ता राहूलदादाच्या नावाची चर्चा होऊ लागलीया... त्येंच्याबरुबर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीनभाऊबी चर्चेत हायती... अजून कुणाच्याबी नावावर फायनल झालं नाय... मात्र संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याची धवलदादांची हातुटी हाय... बघू या काय काय हुतंय ते !
- थोरले आबासाहेब
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.