मतविभाजन हाच 'एमआयएम'चा डाव! महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाचे अध्यक्षांची टीका

'एमआयएम' हा पक्ष स्वतःच्या राज्यात केवळ सात विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढतात. मात्र, उत्तर प्रदेश, बिहार व महाराष्ट्रात किमान 100 जागा लढविल्या जातात. त्यामागे केवळ मतविभाजन हाच त्यांचा हेतू राहिल्याची टीका महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी सोलापुरात केली.
MIM
MIM sakal
Updated on

सोलापूर : शेजारील राज्यातून काही पक्ष येऊन बिर्याणीच्या नावाखाली मुस्लिम समाजाला फसवत आहेत. त्यांची बिर्याणी नको तर आता नागरिकांनी मुलांच्या भविष्याचा विचार करावा. 'एमआयएम' हा पक्ष स्वतःच्या राज्यात केवळ सात विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढतात. मात्र, उत्तर प्रदेश, बिहार व महाराष्ट्रात किमान 100 जागा लढविल्या जातात. त्यामागे नेमका हेतू काय. केवळ मतविभाजन हाच त्यांचा हेतू राहिल्याची टीका महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी सोलापुरात केली.

MIM
सोलापूर : अंध महिलेजवळील ३ वर्षाच्या मुलाचे अपहरण

सोलापूर दौऱ्यावरील महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार डॉ. मिर्झा यांचा शहरातील कॉंग्रेस भवनात जिल्हा अल्पसंख्याक विभागातर्फे आमदार प्रणिती शिंदेंच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्‍वनाथ चाकोते, शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष तौफिक हत्तुरे, नगरसेविका फिरदोस पटेल, जिल्हाध्यक्ष आरिफ पठाण, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, आरिफ शेख, शकील मौलवी, हासीब नदाफ, रुस्तुम कंपली, झुबेर कुरेशी, वाहिद बिजापुरे, मन्सूर गांधी आदी उपस्थित होते.

MIM
मनोज शेजवालविरुध्द विनयभंगाचा गुन्हा

डॉ. मिर्झा पुढे म्हणाले, आता वक्‍फ बोर्डाच्या कोणत्याही कामासाठी कुणालाही औरंगाबादला जायची गरज पडणार नाही. सर्व कामांची नोंदणी ऑनलाइन होईल. नोंदणी व चेंज रिपोर्टसह इतर सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध शहर-जिल्ह्यात वक्‍फ बोर्डाची विभागीय कार्यालये व जिल्हास्तरावर जिल्हा कार्यालये सुरु होतील. सोलापुरातही लवकरच स्वतंत्र कार्यालय सुरु होईल. त्याचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदेंच्या हस्ते होईल, असेही ते म्हणाले.

MIM
कोरोना होतोय कमी! सोलापुरातील कोविड केअर सेंटर बंद; डॉक्‍टरांना मिळेना वेतन

वक्‍फ बोर्डाच्या 40 टक्‍के जमिनीवर अतिक्रमण
संपूर्ण महाराष्ट्रात वक्‍फ बोर्डाच्या सुमारे 97 हजार एकर जमिनी आहेत. त्यात 40 टक्के अतिक्रमण झाले असून त्या सर्व जमिनीतून मिळणारा महसूल जमा केल्यास मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी सरकारकडून निधी घ्यावा लागणार नाही. वक्‍फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, या विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने वक्‍फ बोर्डातील 180 रिक्‍त जागा भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे अतिक्रमण काढण्यास मदत होईल, असा विश्‍वास डॉ. मिर्झा यांनी व्यक्‍त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()