हिंदू धर्मात दानधर्माला विशेष महत्त्व आहे. विशेष तिथी आणि सणाला केलेल्या दानाचे पुण्य हे अगणित असते. धनत्रयोदशी दिवशी केलेल्या दानाला विशेष महत्त्व आहे. तसेच आर्युवेदाची देवता धन्वंतरी देवतेच्या पूजनाचा हा दिवस..आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हटले जाते. धनाची पूजा करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. आजच्या दिवशी शेतकरी आणि इतर कारागीर लोक आपल्या व्यवसायाशी संबंधित अवजारांची पूजा करतात. शेतकरी नांगर, तिफण, कुळव यांसारख्या शेतीशी संबंधित सर्व अवजारांची पूजा करतात. तर व्यापारी पाटावर लक्ष्मीची मूर्ती ठेवून पूजा करतात. हिशेबाच्या वह्या, सोने-नाणे तसेच लिखापडीसाठी आणलेल्या वह्यांची म्हणजे खतावणी व चोपडी असे बोलल्या जाणाऱ्या वह्यांची या दिवशी पूजा होते. व्यापारी आणि शेतकरी वर्गात धनत्रयोदशीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. तसेच धन्वंतरी आणि धन-धान्यांची पूजा केली जाते. शेतकऱ्यांसाठी शेतातून आलेले धान्यच हे संपत्ती व लक्ष्मीप्रमाणेच असल्याने शेतकरी धान्याची पूजा करून धणे, गूळ, खोबरे आणि पुरणपोळीचा नैवेद्य करतात..Dhanteras 2024: घरात सुख समृद्धी येण्यासाठी धनत्रयोदशीला करा हे उपाय, जाणून घ्या.धनत्रयोदशीच्या दिवशी केलेले दान हे महान दान मानले जाते. आर्थिक समस्या असतील किंवा काही कामे अडली असतील तर या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे दान केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते, असे शास्त्र सांगते. विशेषत्वे गाय-वासराला हिरवा चारा, गूळ, डाळी खायला द्याव्यात. वस्त्र तसेच कुवतीनुसार धातू दानही करता येते. लाकडी पाटावर स्वस्तिक काढून त्यावर दिवा लावावा. दिव्याला हळद-कुंकू आणि तांदूळ लावून त्यानंतर धान्य, धन, सोने यांची पूजा करावी.- पंकज महाराज कुलकर्णी, ज्योतिषी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.