सोलापूर : कोरोना रुग्णवाढीचा वेग चिंताजनक असून जिल्ह्यात मागील नऊ दिवसांत 440 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधांनुसार सोलापूर शहर-जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्वच शाळा पुन्हा एकदा बंद (School closed)करण्यात आल्या आहेत.15 फेब्रुवारीनंतर कोरोनाची (Corona)स्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या दोन हजार 796 शाळा असून त्याअंतर्गत साडेतीन लाख विद्यार्थी शिकत आहेत. दुसरीकडे माध्यमिकच्या एक हजार 87 शाळा असून, त्यामध्ये जवळपास सव्वाचार लाख विद्यार्थी प्रवेशित आहेत. दिवाळीनंतर जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या असून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा सुरळीत सुरु होत्या. मुले आता शाळेत रमली होती, तेवढ्यात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली. अद्याप जिल्ह्यातील एकाही शाळेतील मुलगा कोरोना बाधित आढळला नाही. तरीही, खबरदारी म्हणून संपूर्ण शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतला आहे. त्यानुसार उद्यापासून (सोमवारी) एकाही विद्यार्थ्याला शाळेत बोलावू नये, अशा सूचना त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना केल्या आहेत. राज्यातील मुंबई, पुणे येथील शाळा यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत.(Solapur News)
दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा लांबणीवर?
दहावी- बारावीचा अभ्यासक्रम पूर्णपणे शिकवून झाला. तरीही, सध्या ऑनलाइन (Online classes)पद्धतीने शिकवलेला अभ्यासक्रम पुन्हा ऑफलाइन शिकवला जात आहे. परंतु, कोरोनासोबतच ओमिक्रॉनचाही (Omicron)धोका वाढल्याने ऑफलाइन वर्ग पूर्णपणे बंद राहणार आहेत. दरम्यान, बोर्डाच्या वेळापत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक (तोंडी) परीक्षा 14 फेब्रुवारीपासून तर बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारीपासून नियोजित आहे. बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल, तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या काळात होणार आहे. मात्र, कोरोना संसर्गाची संभाव्य स्थिती पाहून वेळापत्रकात बदल होऊ शकतो. प्रात्यक्षिक परीक्षा होईल की नाही, ती लांबणीवर पडेल, असे तर्कवितर्क लढविले जात आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार 10 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळात पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा बंद राहतील. तरीही, 100 टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे. दीक्षा ऍप व ई-लर्निंग ऍप, पारावरील शाळा, गृहभेटीतून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवावे.
- डॉ. किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.