Madha Lok Sabha Election: माढा लोकसभेचा तिढा सुटेना; मविआकडून उमेदवाराबाबत चाचपणी सुरूच; अनिकेत देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेट

Madha Lok Sabha Election: माढ्याच्या उमेदवारीसंदर्भात शरद पवार यांच्याशी प्रथमतः धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर शेकापच्या डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आणि आता डॉ. अनिकेत देशमुख भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे.
Madha Lok Sabha Election
Madha Lok Sabha ElectionEsakal
Updated on

सांगोला : महाविकास आघाडीकडून माढा लोकसभेच्या उमेदवारीच्या उमेदवारीचा तिढा सुटत नसला तरी भेटीगाठींना मात्र जोर आला आहे. माढ्याच्या उमेदवारीसंदर्भात शरद पवार यांच्याशी प्रथमतः धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेकापच्या डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट घेतल्यानंतर आज (ता. ७) रोजी माढा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेले डॉ. अनिकेत देशमुख यांनी शरद पवार यांची बारामती येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे.

भाजपने माढ्यातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. परंतु या उमेदवारीमुळे धैर्यशील मोहिते-पाटील नाराज आहेत. ते कोणत्याही परिस्थितीत माढा लढण्यासाठी इच्छुक आहेत. धैर्यशील मोहिते-पाटलांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नसली तरी मोहिते-पाटील कुटुंब माढा मतदारसंघातील गावभेटी करीत कार्यकर्त्यांशी संपर्कात आहे.

Madha Lok Sabha Election
Inflation: तूरडाळीचे भावही भिडणार गगनाला; स्वयंपाकघराचे ‘बजेट’ कोलमडणार?

भाजपमध्येच नाईक निंबाळकर व मोहिते पाटील वाद चव्हाट्यावर आला असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ’तुतारी’कोण हाती घेईल? यासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे. धैर्यशील मोहिते-पाटील पक्षांतर करून तुतारी हाती घेणार का? याबाबत अद्यापही स्पष्ट झाले नसल्याने माढ्यासाठी धनगर समाजातील व मागील वेळी सांगोला विधानसभा लढवलेले डॉ. अनिकेत देशमुख इच्छुक आहेत. सध्या मराठा व धनगर समाजाच्या मतांचे गोळाबेरीज करण्यासाठी शरदचंद्र पवार गटाकडून डॉ. अनिकेत देशमुख यांचे पारडे जड वाटू लागले आहे.

Madha Lok Sabha Election
Eknath Khadse In BJP Again: ‘सीडी’ची शिडी.... आणि खडसेंची हनुमान उडी

माढ्याच्या उमेदवारीसंदर्भात शरद पवार यांनी अद्यापही ठोस निर्णय घेतली नसला तरी भेटीगाठी मात्र सतत सुरू आहेत. आज (ता. ७) डॉ. अनिकेत देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेऊन माढा मतदारसंघाबाबत सविस्तर चर्चा केली आहे. या अगोदर माढ्याच्या उमेदवारी संदर्भात धैर्यशील मोहिते-पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेटी घेतल्या आहेत. सध्या मोहिते पाटलांची भूमिका स्पष्ट नसल्याने डॉ. अनिकेत देशमुख यांना माढ्यातून उमेदवारीची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Madha Lok Sabha Election
Lok Sabha 2024: तब्बल दहा वर्षांनंतर PM मोदी आज चंद्रपूर दौऱ्यावर; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचाराचं फुंकणार रणशिंग

धैर्यशील मोहिते-पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

गेल्या काही महिन्यापासून ’आमचं ठरलंय’ म्हणत माढा लोकसभेसाठी भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते. परंतु भाजपने पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिले. भाजपकडून तिकीट नाकारल्यानंतरही धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघातील भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत. कार्यकर्ते ’तुतारी’ हाती घेण्यास सांगत असले तरी धैर्यशील मोहिते पाटील आपली भूमिका स्पष्ट करीत नसल्याने माढ्याच्या राजकीय कोंडीचा तिढा सुटताना दिसत नाही. येणाऱ्या काळात मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Madha Lok Sabha Election
Eknath Shinde: महायुतीच्या सर्व उमेदवारांचा जोमाने प्रचार करा; शिंदेंच्या नेत्यांना सुचना

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसंदर्भातच या अगोदरही शरद पवार यांनी चर्चा केली होती. यानंतर आज पुन्हा माढ्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. माढ्याच्या सद्यःस्थितीचा आढावा पवार यांना दिला असून मी माढा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहे. दोन दिवसात पवारसाहेब याबाबत ठोस निर्णय घेतील, असं डॉ. अनिकेत देशमुख यांनी म्हटलं आहे.

Madha Lok Sabha Election
जन्म दाखला कसा काढतात? इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी 31 डिसेंबरपर्यंत 6 वर्षे पूर्ण आवश्यक; ‘RTE’तील 25 टक्के सोडून 75 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.