धवलसिंह मोहिते-पाटील घेणार 'उत्तर'चे पालकत्व! तालुक्‍यात केला दौरा

डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील घेणार 'उत्तर'चे पालकत्व! तालुक्‍यात केला दौरा
dhavalsinh mohite
dhavalsinh mohiteSakal
Updated on
Summary

जिल्ह्यात सर्वांत लहान असलेला उत्तर सोलापूर तालुका हा आपण दत्तक घेत असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांनी केले.

उत्तर सोलापूर : जिल्ह्यात सर्वांत लहान असलेला उत्तर सोलापूर तालुका (North Solapur Taluka) हा आपण दत्तक घेत असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा कॉंग्रेसचे (Congress) अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील (Dr. Dhawalsinh Mohite- Patil) यांनी केले. डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांनी नुकताच उत्तर सोलापूर तालुक्‍याचा दौरा केला. त्या वेळी वडाळा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. उत्तर सोलापूर तालुक्‍यातील नान्नज मोहितेवाडी व बीबीदारफळ या दोन जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला. कॉंग्रेसला पुन्हा बळकटी आणण्याचे आवाहन त्यांनी तालुक्‍यातील जनतेला केले.

dhavalsinh mohite
बनावट डिझेल! पालघरच्या साई ओम पेट्रोने केमिकल आणले कोठून?

नान्नज मोहितेवाडी जिल्हा परिषद गटातील दौरा तळे हिप्परगा येथून सुरू होऊन त्याचा शेवट वडाळा येथे झाला. याशिवाय बीबीदारफळ जिल्हा परिषद गटाचा दौरा डोणगाव येथून सुरू होऊन बीबीदारफळ येथे समाप्त झाला. या दौऱ्यात त्यांनी बूथ यंत्रणा सक्षम करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर लोकांमध्ये मिसळून त्यांची कामे मार्गी लावण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या दौऱ्यात सुदर्शन अवताडे यांनी शिरापूर उपसा सिंचन योजनेचे खरे जनक कै. बाबासाहेब अवताडे असल्याचे सांगितले.

या दौऱ्यात त्यांच्यासोबत आयोजक सुदर्शन अवताडे, लक्ष्मण भोसले, अतिक काझी, गणेश नागुडे, सतीश पाटील, वैभव घोडके, प्रफुल दुधाळ, बाबासाहेब लोंढे, कृष्णा भिसे, बाळासाहेब साखरे, भगवान साखरे, राजू साखरे, यतीराज दडे, माजी तालुकाध्यक्ष सलवदे, सचिन गुंड, शालिवाहन माने, सागर राठोड, युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बहुमोल अवताडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()