डॉ. कसपटे यांना या संदर्भात मिळणारी दुसरी डॉक्टरेट असून, यापूर्वी त्यांना बंगळूर विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले होते.
बार्शी (सोलापूर) : एनएमके-1 गोल्डन सीताफळाचे (NMK-1 Golden Custard Apple) निर्माते डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे (Dr. Navnath Malhari Kaspate) यांच्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असून, किंगडम ऑफ टोंगा देशातील राष्ट्रकुल विद्यापीठाकडून (Rashtrakul University in the Kingdom of Tonga) आंतरराष्ट्रीय दर्जाची डॉक्टर ऑफ सायन्स (Doctor of Science) पदवी देऊन डॉ. कसपटेंना दिल्ली येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले असून, मानाचा तुरा खोवला गेल्याने कौतुकाचा वर्षाव होत आहे. गोरमाळे (ता. बार्शी) येथील अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ कसपटे यांना टोंगा या ओशनिया खंडाच्या देशातील माकंगा येथील राष्ट्रकुल व्यावसायिक विद्यापीठाच्या वतीने 11 जुलै रोजी दिल्ली येथे कार्यक्रमात डॉक्टर ऑफ सायन्स पदवी बहाल करण्यात आली. डॉ. कसपटे यांना या संदर्भात मिळणारी दुसरी डॉक्टरेट असून, यापूर्वी त्यांना बंगळूर विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले होते. (Dr. Kaspate of Barshi, received an international standard doctorate from the Rashtrakul University-ssd73)
किंगडम ऑफ टोंगा या ओशनिया खंडातील देशातील माकंगा येथील राष्ट्रकुल व्यावसायिक विद्यापीठाच्या विशेष निवड समितीने दिल्ली येथे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रिपू रंजन सिंन्हा यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देण्यात आली. या वेळी विद्यापीठाचे संस्थापक- सदस्य प्रो. राकेश मित्तल, डॉ. प्रियदर्शनी नायर, केंद्रीय मंत्रालय प्रतिनिधी सैफी अख्तर आदी मान्यवर उपस्थित होते.
किंगडम ऑफ टोंगा हा देश ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एका छोटा द्विपसमूहातील देश असून, दक्षिण प्रशांत महासागरातील 176 लहान बेटांवर वसला आहे. येथील कृषी विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कौसा यांनी केलेल्या सूचनेवरून डॉ. कसपटेंना सन्मानाबरोबरच टोंगा देशाचे विशेषाधिकार देण्यात आले आहेत. डॉ. कसपटे गेल्या 45 वर्षांपासून सीताफळ शेतीमध्ये काम करत असून, त्यांनी विकसित केलेल्या एनएमके-1 गोल्डन सीताफळ वाणाला पीक वाण संरक्षण, शेतकरी हक्क कायदा कलम 2001 अन्वये स्वामित्व हक्क प्राप्त झाला आहे.
मधुबन फार्मवर डॉ. कसपटे यांनी हस्तपरागीकरणाचा यशस्वी प्रयोग केला असून, त्यातून निर्माण झालेल्या नवीन 2500 वाणाची लागवड केली आहे. हे वाण सध्या प्रयोगावस्थेत आहे. एनएमके-1 गोल्डन वाणाची लागवड केल्यामुळे अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांना करोडपती केले असून, संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातूनही वाणाला मागणी वाढत आहे. देशात होत असलेल्या सीताफळ लागवडीमध्ये तब्बल 80 टक्के वाटा एनएमके-1 गोल्डन वाणाचा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.