Solapur: 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या बंधनात बांधू नका'

अर्जुन डांगळे : पॅंथर चळवळच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त परिषद
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkaresakal
Updated on

सोलापूर - डॉ. आंबेडकरांनी सामजिक सुधारणेपलिकडे बाबासाहेबांचे काम खूप मोठे आहे. बाळंतपणाची रजा, आठ तासांचा दिवस, भाक्रानांगल धरण याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजना अशा अनेक क्षेत्रात त्यांनी काम केलेले आहे.

यामुळे . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या बंधनात बांधू नका, असे आवाहन दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य अर्जुन डांगळे यांनी केले.

Dr. Babasaheb Ambedkar
Pune News : विश्वकर्मा कॉलेज, पुण्याच्या अकरावीतील विराजचे खगोलशास्त्रात उल्लेखनीय यश

सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित ‘जागर क्रांतीचा उत्सव विचारांचा’ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी विचार मंचावर प्रा. डॉ.लक्ष्मण यादव (नवी दिल्ली), प्रा. राजेंद्र कोणारकर, ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड, प्रा. डॉ. एम.आर. कांबळे,

दलित पॅंथरचे पहिले जिल्हाध्यक्ष बसवराज कपाळे, आत्मबलिदान केलेले पॅंथर नारायण गायकवाड यांच्या पत्नी मंदोदरी गायकवाड, विद्रोही कवी बाबुराव बागुल यांचे नातू मनोज बागुल आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या दोन दिवसीय परिषदेचा रविवारी समारोप झाला.

Dr. Babasaheb Ambedkar
Mumbai Bjp: भाजपच्या माजी नगरसेविकेला पतीची मारहाण; नेमकं काय आहे कारण?

यावेळी अर्जुन डांगळे म्हणाले की, सद्यस्थितीत विचार स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे.‘दलित पॅंथर’ अन्यायाविरुद्ध हक्क व स्वाभिमानासाठीचा धगधगता अंगार होता, तेव्हा रस्त्यावरची लढाई संपू देऊ नका.

यावेळी प्रा. डॉ. लक्ष्मण यादव म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील सर्वांच्या कल्याणासाठी योगदान होते. समतेसाठी त्यांचा लढा होता.

याप्रसंगी प्रा. कांबळे, दत्ता गायकवाड, कपाळे यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रस्ताविक निमंत्रक अतिश बनसोडे यांनी केले.

सूत्रसंचालन प्रा. अंजना गायकवाड यांनी केले तर आभार संयोजन समितीचे अनुराग सुतकर यांनी मानले. यावेळी संयोजन समितीचे सत्यजित वाघमोडे, सुकांत वाघमारे,  पृथ्वीराज मोरे, चंद्रकांत सुरवसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.